अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येतेय. महाविद्यालय परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे कॉलेज बंद करण्यात आलंय. ही घटना पुण्यातील लोहगाव भागात घडली आहे. वडगाव शिंदे रस्त्यावर आरआयटी कॉलेज आहे. या कॉलेजच्या आवारात बिबट्या शिरलाय, अशी माहिती समोर आलीय. त्यामुळे कॉलेज बंद करण्याचा निर्णय कॉलेज प्रशासनाने घेतलाय. कॉलेज आवारात बिबट्या (Pune News) आहे, असं समजल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
कॉलेज आवारात बिबट्याचा वावर
आरआयटी कॉलेजमध्ये आता अग्निशमन दल आणि वनविभाग दाखल झालेत. प्राथमिक माहितीनुसार, या महाविद्यालयाच्या आवारात २ बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कॉलेज पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. कॉलेजमधील एका कॅन्टीनमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्याने बिबट्याला पाहिलं असल्याची माहिती मिळतेय. वन विभागाकडून बिबट्याचा (Leopard) शोध घेण्याचं कार्य सुरू आहे.
कॉलेज बंद करण्याचा निर्णय
आतापर्यंत आपण बिबट्याच्या हल्लाच्या बातम्या ऐकलेल्या आहेत. या घटनांमध्ये आजवर अनेकजणांचा मृत्यू झालाय. त्यामुळेच आरआयटी कॉलेज बंद करण्यात आलंय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय प्रशासनाने हा निर्णय (College Closed In Lohgaon Area of Pune) घेतलाय. कॉलेजमध्ये बिबट्या आहे, हे कळताच विद्यार्थ्यांची मोठी घाबरगुंडी उडालीय. आता घटनास्थळी अग्निशमन दल आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बिबट्याचा शोध घेतला जातोय.
छत्रपती संभाजीनगरमधील घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. ही घटना जून महिन्यात जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील भांबरवाडी परिसरात घडली होती. मृत्यू झालेल्या मुलाचं नाव ऋषिकेश राठोड (Leopard Attack) होतं. वन विभागाने भांबरवाडी बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केलं होतं. घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला होता. त्यांनी या मृत मुलाच्या कुटुंबाला तात्काळ २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात मिळवून दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.