Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : ट्रांसफार्मर फेल झाल्याने तीन दिवसांपासून १२ गावे अंधारात; वीजवितरक कंपनीचे दुर्लक्ष

Nandurbar News : वीज वितरण कंपनी गेल्या तीन दिवसांपासून वीज दुरुस्तीसाठी कोणतेही उपाययोजना न करत आदिवासी गावांकडे दुर्लक्ष

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: महावितरणच्या दुर्लक्षामुळे मागील तीन दिवसांपासून १२ गावांमध्ये अंधार पसरलेला आहे. या (Nandurbar) गावांना वीज कनेक्शनने जोडणारे ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे. मात्र महावितरणकडून (Mahavitaran) यात दुरुस्ती किंवा नवीन बसविण्याचे काम केले जात नाही. (Live Marathi News)

आदिवासी गावांमध्ये महावितरणने टाकलेल्या वीज लाईनवरील ट्रांसफार्मर फेल झाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील बारा गावे गेल्या तीन दिवसापासून अंधारात आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा या उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने एकूण १२ आदिवासी गावांना विजेअभावी अंधाराचा सामना करावा लागत असून दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहेत. तर वीज वितरण कंपनी गेल्या तीन दिवसांपासून वीज दुरुस्तीसाठी कोणतेही उपाययोजना न करत आदिवासी गावांकडे दुर्लक्ष करत असल्याने आदिवासी बांधव आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रात्रीच्या अंधारात भीती 

अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या १२ गावांचा हा परिसर जंगल भागात आहे. यामुळे येथे हिंस्र प्राण्यांचा वावर देखील असतो. यात महावितरणच्या दुर्लक्ष्यामुळे गावांमध्ये अंधार आहे. यामुळे गावात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT