Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Navapur Borpada Dam : जीवलग मैत्रिणींचा धरणात बुडून मृत्यू; नवापूर तालुक्यातील बोरपाडा धरणातील घटना

Nandurbar News : धरणाच्या काठावरील दगडावर बसुन त्या आंघोळ करत असताना उज्वला गावित आणि मिखा गावित यांचा पाय घसरून धरणातील खोल पाण्यात पडल्या

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : धरणातील पाण्यात आंघोळ करण्यासाठी दोन मैत्रिणी गेल्या होत्या. दगडावरून पाय घसरून खोल पाण्यात पडल्याने दोघींचा बुडून मृत्यू झाला. हि धक्कादायक घटना नवापूर तालुक्यातील बोरपाडा धरणात सकाळी घडली. यामध्ये बेडकी येथील दोन युवतींचा समावेश आहे. 

नवापूर तालुक्यातील बेडकी येथील उज्वला जयंत्या गावित (वय १६) आणि मिखा सानु गावित (वय १६) दोन्ही मैत्रिणी बेडकी गावालगतच्या बोरपाडा धरणाच्या किनारी आंघोळीला गेल्या होत्या. धरणाच्या काठावरील दगडावर बसुन त्या आंघोळ करत असताना उज्वला गावित आणि मिखा गावित यांचा पाय घसरून धरणातील खोल पाण्यात पडल्या. पोहता येत नसल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही. शिवाय घटना घडली यावेळी परिसरात कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळू न शकल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व मुलींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन्ही मुलींचे मृतदेह धरणाच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मिळून आले. दरम्यान विसरवाडी पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सदर घटनेत दोन्ही जीवलग मैत्रिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे बेडकी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

Maharashtra Live Update: नांदगावला धुवाधार पाऊस लेंडी नदीला पुर .रेल्वे अंडरपास 3 फूट पाण्याखाली

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT