Nandurbar News : पाण्याअभावी पेरणी केलेले रोप करपून जाण्याची भीती; वादळी वाऱ्याने वीज पुरवठा खंडित

Nandurbar news : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे विद्युत खांब रोहित्रीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे 

नंदुरबार : काही भागात मान्सूनपूर्व पेरणीला सुरवात झाली आहे. बागायतदार शेतकरी पिकांना पाणी देऊन पीक जगवत आहेत. मात्र वादळी वाऱ्यामुळे अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात विद्युत पोल वादळे आहेत. यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतात लागवड केलेल्या पिकांना पाणी देता येत नाही, कडक उन्हामुळे हे पीक आता करपून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   

Nandurbar News
Beed ACB : लाचखोर कार्यकारी अभियंत्याच्या घरात सापडले लाखोंचे घबाड; दागिनेही केले जप्त

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे विद्युत खांब रोहित्रीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तालुक्यातील १३२ केव्ही उपकेंद्राचे रोहित्र जळाल्याने ग्रामीण भागातील वीज खंडित झाली आहे. गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे विजेच्या तारा व रोहित्र जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळामुळे विजेच्या तारा तुटल्या, तसेच विद्युत पोल आडवे पडले आहेत.

Nandurbar News
Amravati News : वादळी वाऱ्याने केळीचे पीक उद्ध्वस्त; अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठा फटका

तळोदा व अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील ग्रामीण भागात वीज खंडित झाल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. वाढत्या तापमानामुळे पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत. तालुक्यात केळी, मिरची, ऊस व पपई पिकांची लागवड करण्यात आली आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने लावलेली रोपे करपू जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  महावितरण विभागाकडून दुरुस्तीची कामे लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com