Navapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Navapur Crime : एटीएम फोडण्यासाठी चोरटे आले; सायरन वाजताच ठोकली धूम, एकाला पकडण्यात यश

Nandurbar Navapur News : रात्रीच्या सुमारास अधिक रहदारी नसल्याचा फायदा घेत चोरटे एटीएम वर लक्ष केंद्रित करत यातील रक्कम लांबवीत आहेत. असाच प्रकार नवापूर मध्ये घडला असून चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: एटीएम मशीनवर लक्ष करत मशीन फोडून त्यातील रक्कम लांबविण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्या जवळ असणारे स्टेट बॅकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला आहे. एटीएम मशीनच्या कॅबिन मध्ये चोरट्यांनी प्रवेश करत फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र याठिकाणी लावलेला सायरन वाजल्यानंतर चोरटयांनी धूम ठोकली. 

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात मध्यरात्रीनंतर हि घटना घडली आहे. यात रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी हनुमान मंदिराच्या शेजारील असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीनला फोडण्याचा प्रयत्न केला. या चोरट्यानी मशीनचा पत्रा उचकवून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एटीएममध्ये लावलेला सायरन वाजल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला आणि ते याठिकाणाहून घाबरून पळून जाऊ लागले. 

एक चोरटा रंगेहाथ पकडला 

त्याच दरम्यान परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीस गाडीतील चालक किशोर वळवी यांनी एका चोरट्याला रंगेहाथ पकडले. मात्र उर्वरित चार चोरटे अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत. चोरट्यांनी एटीएम मशीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून, याबाबत माहिती मिळताच बँकेचे अधिकारी आणि पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे. दरम्यान यातील रक्कम सुरक्षित आहे. 

यवतमाळतील चोरीच्या १६ दुचाकी जप्त
दुचाकी सराईत तीन चोरट्यांना यवतमाळ लोहारा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान जिल्हा पोलिस अतिशय कुमार चिंता यांनी लोहारा पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले असून जप्त केलेल्या काही दुचाकी बाहेर जिल्ह्यातील आहेत. निलेश मुनेश्वर, गणेश उले अणि आदित्य राऊत असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी बाहेर जिल्ह्यातून चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून तब्बल 16 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, कोर्टात काय काय झालं?

Maharashtra News Live Update: मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT