Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: मृत्यूनंतरही मरण यातना; अंत्यसंस्कारासाठी दोर लावून करावी लागते नदीपार

Nandurbar News : मृत्यूनंतरही मरण यातना; अंत्यसंस्कारासाठी दोर लावून करावी लागते नदीपार

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
 : मृत्यूनंतरही मरण यातना सुटत नसल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर (Navapur) तालुक्यातील वागदे गावात पाहण्यास मिळत आहे. आदिवासी बांधवांना अंतिम संस्कार करण्यासाठी (Nandurbar) नदी नाल्यातून ४ ते ५ फूट खोल पाण्यातून अंत्यविधी करण्यासाठी जावे लागत आहे. (Tajya Batmya)

देश स्वतंत्र होऊन ७६ वर्ष झाली. तरी आदिवासींची हेळसांड थांबता थांबत नाही. नवापूर तालुक्यातील वागदे गावातील ग्रामस्थांना स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नदी नाल्यातून मार्गस्थ व्हावे लागते. स्मशानभूमीत जाण्यासाठी नाल्यावर छोट्याशा पुलाची मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने आदिवासींनी नाराजी व्यक्त केली आहे. आदिवासी विकास मंत्री यांच्या जिल्ह्यात हा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसात नदीला पूर असताना देखील ग्रामस्थांना ३-४ फूट पाण्यात दोर बांधून अंत्यविधीसाठी स्मशानभूमी गाठावी लागते.

१९८ ग्रामपंचायतीतच स्मशानभूमी 
नंदुरबार जिल्ह्यात एकूण ६३८ ग्रामपंचायत आहेत. त्यापैकी १९८ ग्रामपंचायतीत स्मशानभूमी आहे. तर ४४० ग्रामपंचायतीत स्मशानभूमी नसल्याची माहिती समोर आली आहे. राहिलेल्या ग्रामपंचायत समशानभूमी तयार करण्याच्या प्रस्ताव शासनाला सादर केल्याची माहिती नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सूत्राने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Idli Recipe: इडली चिकट, वातड होतेय? मग पिठात 'हा' १ पदार्थ वापरा; मऊ लुसलुशीत होतील इडल्या

Blast In Mosque: नमाजावेळी मशिदीमध्ये स्फोट, ५४ जण जखमी, घटनास्थळी सापडली AK-47

Mercury Vakri In Tula: 10 नोव्हेंबरपासून 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस; 12 महिन्यांनी बुध ग्रह होणार वक्री

Eye Care: तुम्हालाही रोज आयलाइनर लावायला आवडत? तर होऊ शकतात हे वाईट परिणाम, आजपासूनच घ्या काळजी

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT