National Youth Congress दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबार: महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध

नंदुरबार, नवापूर आणि तळोदा तालुक्यात महागाई वाढल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे गॅससिलेंडर व दुचाकी वाहन ठेऊन केंद्रातील मोदी सरकारचा निषेध...

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

दिनू गावित

नंदुरबार: जिल्ह्यातील नवापूर आणि तळोदा येथे केंद्र सरकारच्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले आहे. देशात व राज्यात सध्या इंधन, गँस, तेल व भाजीपाला यांचे दर गगनाला भिडले आहे. महागाई वाढल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे गॅससिलेंडर व दुचाकी वाहन ठेऊन केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या आदेशानुसार आज नवापूर शहरात महागाईच्या विरोधात निषेध मोर्चा व निषेध आंदोलन करण्यात आले. नवापूर शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर गॅससिलेंडर व दुचाकी वाहन यांना पुष्पहार घालून मोदी सरकारचा तीव्र निषेध केला.

हे देखील पाहा-

महागाईमुळे सर्व सामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे.जनता महागाईने हैराण झाली आहे.केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवानेते अँडहोकेट राऊ मोरे म्हणाले की, इंधन गँस, तेल, भाजीपाला यांचे भाव गगनाला भिडले आहे. महागाईमुळे सर्व सामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. जनता हेराण झाली आहे. महागाईच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करीत आहोत.

यावेळी नवापूर पालिकेचे विरोधी पक्षानेते नरेंद्र नगराळे, चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटु अहिरे, जिल्हा सरचिटणीस सनी सावरे, गोलु राजपूत, मयुर सावरे,विकी महाले,अजय जाधव, अविनाश जाधव,अर्जुन सावरे,हेमंत नगराळे, मिलिंद बागले,रेहान खाटीक,अली खाटीक, शाहरुक खाटीक, सलामन बागवान,समिर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काँनस्टेबल निजाम पाडवी, पवन राजपूत यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

BMC elections : मी मोदींचा भक्त, मुंबईवर भाजपचं कमळ फुलणारच, महेश कोठारे काय म्हणाले?

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

SCROLL FOR NEXT