Nandurbar Adivasi Morcha Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Adivasi Morcha : नंदूरबार का पेटलं? आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; १४० हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

Nandurbar Adivasi Morcha Update : नंदूरबारमध्ये आंदिवासी मोर्चाला हिंसक वळण लागलं. या प्रकरणी १४० हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Vishal Gangurde

नंदूरबारमधील आदिवासी समाजाच्या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि तोडफोड

२५ पेक्षा जास्त पोलीस आणि ७ नागरिक जखमी

पोलिसांनी १४० हून अधिक आंदोलक ताब्यात

सोशल मीडियाद्वारे भडकवणाऱ्यांवर गुन्हे दाखल

सागर निकवाडे, साम टीव्ही

नंदूरबारमधील आदिवासी समाजाच्या मोर्चाला काल हिंसक वळण लागलं. या आंदोलनात दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झाल्याची देखील घटना घडली. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत नागरिकांसह पोलीस देखील जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा मोठा बडगा उगारला आहे. नंदूरबार पोलिसांनी आतापर्यंत १४० हून अधिक आंदोलक ताब्यात घेतले आहेत.

नंदुरबार पोलिसांनी मुकमोर्चादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील शासकीय कार्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणी १४० हून अधिक जणांना ताब्यात घेतलं. यातील १३ जणांची ओळख परेड झाल्यानंतर त्यांचा सहभाग दिसून आला नाही. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले आहे. तर या दगडफेक आणि हल्लात 25 हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि ०७ नागरिक जखमी झाले आहेत.

मोर्च्यामधील समाजकटंकांनी ही तोडफोड केली. या प्रकरणात ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेराद्वारे तपासणी करुन त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या घटनेबाबात सोशल मीडियाद्वारे लोकांना भडकणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल केले जात आहेत. या प्रकरणी नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहेत.

आदिवासी तरुणाच्या हत्या प्रकरणावरून नंदूरबारमध्ये हा मूक मोर्चा काढण्यात आला होता. या हत्या प्रकरणातील आरोपी आणि पीडित या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून एका अफेयरच्या वादातूनच दोघांमध्ये ही घटना घडल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक नंदुरबारमध्ये ठाण मांडून बसले असून प्रत्येक घटनेचा आढाव घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - आरक्षणाबाबत अजित पवारांचं मोठं विधान

Swami Chaitanyananda Saraswati : आय लव्ह यू, बेबी.... आश्रमातल्या बाबाचे एकापेक्षा एक कारनामे, Whatsapp चॅट उघड

Subodh Bhave: सुबोध भावे झळकणार नव्या बायोपिकमध्ये; निम करोली बाबांची साकारणार भूमिका, पोस्टर प्रदर्शित

Satara : वरवी पिठाची भाकरी खाल्ल्याने ७० जणांना विषबाधा; पीठ विक्रेत्यांचे दुकाने सील

२ गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला; NCP आमदाराच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT