Tragic Accident : Saam tv
महाराष्ट्र

Tragic Accident : मामाच्या गावाला जाताना काळाचा घाला; मुलाला ST बसने चिरडलं, सोन्यासारखा लेकाचा डोळ्यादेखत मृत्यू पाहून वडिलांचा आक्रोश

nandurbar accident : नंदूरबारमध्ये एसटी बसने ८ वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना घडली आहे. पालकांच्या डोळ्यांसमोरच लेका मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू पाहून पालकांनी एकच आक्रोश केला.

Vishal Gangurde

सागर निकवाडे, साम टीव्ही

नंदूरबारमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. नंदूरबारमधील शहादा एसटी बसने एका विद्यार्थ्याला चिरडल्याची घटना घडली आहे. बसची वाट बघत असलेल्या आठ वर्षीय विद्यार्थ्याला बसने मागून धडक दिली. बसच्या धडकेत आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर पालकांनी एकच आक्रोश केला.

नंदूरबारमध्ये एसटी महामंडळाच्या बसने विद्यार्थ्याला चिरडलं. मामाच्या गावी जाण्यासाठी बसची वाट बघत असलेल्या आठ वर्षीय विद्यार्थ्याला बसने मागून धडक दिली. बस मागे घेत असताना आठ वर्षीय बालकाला धडक दिली. बसच्या धडकेत आठ वर्षीय रुद्र मोरे या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. लेकाचा मृत्यू बघून बापाने आक्रोश केला. मुलाचा मृत्यू झाल्याने पालकांच्या डोळ्यातून पाणी आलं.

नेमकं काय घडलं?

राज्यभरातील बालवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेची सुट्टी लागली आहे. नंदूरबारमधील रुद्रला शाळेची सुट्टी लागली होती. शाळेला सुट्टी लागल्याने रुद्र आई-वडिलांसह मामाच्या गावाला निघाला होता. आज मंगळवारी रुद्र त्याच्या पालकांसह मामाच्या गावाला जाण्यासाठी शहादा बस स्थानक परिसरात पोहोचला होता. शहादा स्थानकावर बसची वाट सर्व उभे होती. त्यावेळी स्थानकावर एक एसटी चालक बस मागे वळवत होता. त्याचवेळी रुद्र एसटी बसखाली चिरडला गेला. या भीषण अपघातात रुद्रचा मृत्यू झाला.

८ वर्षीय रुद्रच्या मृत्यूनंतर शहादा बस स्थानक परिसरात पालकांनी एकच आक्रोश केला. मुलाच्या मृत्यूनंतर पालकांनी एकच संताप व्यक्त केला. जोपर्यंत बस चालकावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा पालकांनी दिला. रुद्रच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mirchi Bhaji: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत अन् खमंग मिरची भजी; सोपी रेसिपी वाचा

NCERT Partition Module : भारत-पाकिस्तान फाळणीचं नवं मॉड्यूल; काँग्रेस जबाबदार, नेहरूंच्या भाषणाचाही दाखला

गोविंदांनी उंच मनोऱ्यावर केला ‘छावा’चा सीन; मुख्यमंत्र्यांनी टाळ्या वाजवून दिली दाद |VIDEO

Maharashtra Live News Update: हिंगोली : राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी

Peacock Feather Benefits: मोरपिस खिशात ठेवण्याचे फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT