NANDURBAR GIRLS HOSTEL CONTROVERSY: ALLEGED PLOT TO POISON 22 STUDENTS SPARKS PROTEST AND DEMAND FOR INVESTIGATION Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar : नंदुरबार हादरलं! शासकीय वसतिगृहात २२ मुलींवर विषप्रयोगाचा खळबळजनक आरोप; प्रशासनाची धावपळ

Nandurbar News : नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात २२ विद्यार्थिनींच्या अन्नात आणि पाण्यात विष मिसळण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Alisha Khedekar

सागर निकवाडे, नंदुरबार

नंदुरबार शहरातील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वसतिगृहात राहणाऱ्या तब्बल 22 विद्यार्थिनींच्या अन्नात आणि पिण्याच्या पाण्यात विष मिसळण्याचा कथित कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिला कर्मचाऱ्यांमधील कथित संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग समोर आले. या ऑडिओ क्लिपमध्ये विद्यार्थिनींच्या अन्नात आणि पाण्यात विष टाकण्याबाबत चर्चा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थी परिषद तसेच वसतिगृहातील विद्यार्थिनींनी या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वसतिगृह प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह विद्यार्थिनींनी वसतिगृहाबाहेर आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. हा थेट 22 मुलींच्या आयुष्याशी खेळ आहे. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात जर असे प्रकार घडत असतील, तर पालकांनी आपल्या मुलींना पाठवायचे कसे ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट पुरावे असतानाही प्रशासन कारवाई का करत नाहीये? कोणाला पाठीशी घातले जात आहे? दोषी महिला कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, अन्यथा हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात तीव्र केले जाईल, असा इशारा विद्यार्थी परिषदेने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: मोदी सरकार बेरोजगारांना २,५०० रुपये देणार? काय आहे केंद्राच्या योजनेचं सत्य?

वयाची तिशी गाठलेल्यांनाही होतोय डायबिटीज; 'ही' 5 लक्षणं दिसताच करा चेकअप

Made in Pakistan Cosmetics: पाकच्या सौंदर्यप्रसाधनांचा राज्यात सुळसुळाट; ‘गोरी ब्युटी क्रीम’चं संगमनेर कनेक्शन

Pakistan Blast: शांतता रॅलीदरम्यान मोठा स्फोट; ७ जण ठार, १८ जखमी

'सर्वच क्षेत्रात वजन कमी, येणारा काळ आपलाच, आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली, मुंडे भाऊ-बहिणीच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT