ATM Crime Saam tv
महाराष्ट्र

ATM Crime : स्टेट बँकेचे एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार; नंदुरबार शहरातील घटना 

Nandurbar News : रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मशिनकडे मोर्चा वळवला. या चोरट्यांनी एटीएम मशीन न तोडता संपूर्ण मशीन थेट गाडीतच टाकून पसार झाले.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
:एटीएम मशीममधून रोकड काढून लांबविणे, कटरच्या सहाय्याने मशीन कापून चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र (Nandurbar) नंदुरबार शहरात  स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरट्यांनी (ATM Crime) लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. (Latest Marathi News)

नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम लावण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम (ATM) मशिनकडे मोर्चा वळवला. या चोरट्यांनी एटीएम मशीन न तोडता संपूर्ण मशीन थेट गाडीतच टाकून पसार झाले. यानंतर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर जाऊन एटीएममधून पैसे काढत खाली एटीएम मशीन कोळडे गावाजवळ शेतात फेकून दिल्याचे आढळून आले. गावातील नागरिकांना हे मशीन दिसल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. 

  
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२६ लाखाची रोकड लांबविली 

चोरट्यांनी लांबविलेल्या एटीएममध्ये २६ लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली. चोरट्यांनी मशीन फेकलेल्या ठिकाणी (POlice) पोलीस पोहचले असून तपास सुरु केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज काढून चोरट्यांची ओळख पटविली जात असून पोलिसांकडून आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

High cholesterol: औषधं न घेता कसं कमी कराल कोलेस्ट्रॉल? डॉक्टरांनी सांगितलं काय खावं आणि काय खावू नये!

SCROLL FOR NEXT