Rabi Crops : रब्बी हंगामातील पीक काढणीला सुरुवात; दराबाबत मात्र चिंता

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पूर्णतः वाया गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर लागल्या होत्या.
Rabi Crops
Rabi CropsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात (Rabi Crops) रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, मका, ज्वारी, भुईमूग अशा पिकांची लागवड (Nandurbar) करण्यात आली होती. त्यामुळे हे पिकं काढायला सुरुवात झाली आहे. (Latest Marathi News)

Rabi Crops
HSC Exam 2024 : इंग्रजी पेपरला परभणी जिल्ह्यातील 953 विद्यार्थ्यांची दांडी, 20 जणांना काॅपी करताना पकडलं

नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पूर्णतः वाया गेला होता. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर लागल्या होत्या. मात्र हवामानाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी आता पीक जगवली असून काढणीला आले आहेत. मात्र (Wheat) गहू, हरभरा, मका या पिकांना चांगला भाव मिळणार का? हे आता शेतकऱ्यांसमोर आव्हान राहणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rabi Crops
PM Modi Cabinet Decision : ऊस एफआरपी ते अंतराळ क्षेत्रात एफडीआय.... मोदी मंत्रिमंडळाचे ५ महत्वाचे निर्णय वाचा !

अवकाळीची शक्यता 

वातावरणात बदल झालेला पाहण्यास मिळत असून हवामान खात्याकडून दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे काढणीला आलेले पीक काढून घेण्यावर शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. शेतातून माल काढून घरात नेण्याची धावपळ शेतकऱ्यांची सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com