Crime News Saam tv
महाराष्ट्र

अत्याचार करून चिमुकलीला केले ठार; महिलेसह चार नराधमांना अटक

अत्याचार करून चिमुकलीला केले ठार; महिलेसह चार नराधमांना अटक

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबारः रेल्वे स्थानकावर रडत उभ्या असलेल्या दोन वर्षीय बालिकेस महिलेसह चौघांनी उचलून नेऊन तिच्यावर रात्री अत्याचार केला. यानंतर गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महिलेसह चौघांचा पोलिसांनी (Police) शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. (nandurbar crime news girl tortured and killed Four parson were arrested)

नंदुरबार (Nandurbar) शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील रेल्वे नियंत्रण कक्षालगतच्या शौचालयाच्या टाकीत पाण्यावर ५ जुलैला सकाळी सातच्या सुमारास लहान बालिकेचा (वय अंदाजे २ वर्षे) मृतदेह (Crime News) आढळला होता. पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी या घटनेबाबत पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांना कळवून चिमुकलीचे मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनाचा अहवाल गुरुवारी (ता. ७) प्राप्त झाल्यानंतर नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक हेमंत मोहिते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध लैंगिक अत्याचार व खून करून पुरावा नष्ट केल्याबाबतचा गुन्हा नोंदविण्यात आला.

असा लागला छळा

नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात फिरणाऱ्या महिलेकडे ३ जुलै २०२२ सायंकाळी अंदाजे दोन वर्षे वयाची लहान मुलगी होती व तिच्यासोबत आणखी तीन ते चार जण फिरत होते, अशी गुप्त बातमी पोलिस अधीक्षक पाटील यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक कळमकर यांच्यासह पथकाने शहरातील कंजरवाडा, रेल्वेस्थानक व आजूबाजूच्या परिसरात संशयित महिलेचा शोध घेतला. नंदुरबार शहरातील उड्डाणपुलाखाली एका कॉलमच्या आडोशाला एक महिला बसलेली दिसली. त्याचे वर्णन संशयित महिलेच्या वर्णनाशी मिळतेजुळते असल्याने तिला ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक पाटील यांनी महिला पोलिस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या समक्ष संशयित महिलेकडे विचारपूस केली असता तिच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली.

पतीकडून चिमुकलीवर अत्‍याचार अन्‌ महिला बाजूला उभी

तिचा पती रणजित पवार तसेच रवींद्र पावरा, मुकेश आर्य असे चलथान (गुजरात) येथून नंदुरबारला येत असताना चलथान परिसरात संशयित महिलेस लहान मुलगी रडताना दिसली. संशयित महिलेने व तिच्यासोबत असणाऱ्यांनी मुलीस उचलून रेल्वेने नंदुरबार येथे आणले. त्यांनी रात्री मद्यप्राशन केले व रेल्वे स्थानकाकडे निघाले. त्या वेळेस त्यांच्यासोबत असलेली चिमुकली झोपी गेली होती. रात्री रणजित, रवींद्र, मुकेश यांनी तिला रेल्वे कॉलनी परिसरातील रेल्वे नियंत्रण कक्षालगत असलेल्या सेफ्टी टँकजवळील भागात आणले. त्या वेळी संशयित महिला रस्त्यावर उभी राहून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवत होती. तिचा पती रणजित पवार याने चिमुकलीवर अत्याचार केला. जिवाच्या आकांताने रडणाऱ्या चिमुकलीचा रणजितने गळा आवळून खून केला. त्यानंतर सर्वांनी मिळून मृतदेह रेल्वे कॉलनी परिसरातील नियंत्रण कक्षालगतच्या सेफ्टी टँकमध्ये फेकून दिला. संशयित महिलेस विचारपूसदरम्यान महिलेचा पती रणजित दीना पवार नवापूर येथे असल्याची माहिती मिळाली. नवापूर पोलिसांनी रणजितला नवापूर शहरातून ताब्यात घेतले. तर मुकेश नारायण आर्य व रवींद्र विजय पावरा यांना नंदुरबार येथून ताब्यात घेतले. संशयित महिलेने दिलेल्या माहितीची रणजित, मुकेश व रवींद्र यांच्याकडून खात्री केली असता त्यांनीदेखील गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त भव्य मिरवणूक

Ticket Collector: '...तर मी रोज प्रवास करेन', ट्रेनमधील हँडसम TC ला पाहून तरुणी पडली प्रेमात, VIDEO

Aadhaar Card: नागरिकांना सुप्रीम कोर्टाचा 'आधार'; नागरिकत्वासाठी आधार कार्ड ग्राह्य धरा, निवडणूक आयोगाला आदेश

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Ananya Panday: अनन्या पांडेचा मीडियासमोर फोटो काढण्यास नकार, कारणही सांगितलं, म्हणाली- मी ५ वाजता उठले...

SCROLL FOR NEXT