Nandurbar Crime Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime : मुलीने घरी बोलावत शिक्षकासोबत केला भयानक प्रकार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली खंडणी

Nandurbar News : नंदुरबार येथील एका शिक्षकाला महिन्याभरापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून धुळे येथील एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली रिक्वेस्ट शिक्षकाने स्वीकारली. यानंतर दोघांची चॅटिंग सुरू झाली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे  

नंदूरबार : सोशल मीडियावरून फ्रेंड फिक्वेस्ट पाठवून मैत्रीच्या जाळ्यात ओढले जाते. यातून फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशाच प्रकारे नंदुरबार येथील शिक्षकाला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करणे चांगलेच महागात पडले आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाख खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार येथील एका शिक्षकाला महिन्याभरापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून धुळे येथील जी. टी. पी. स्टॉप जवळील एका मुलीशी फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. हि रिक्वेस्ट त्या शिक्षकाने स्वीकारली. यानंतर दोघांची चॅटिंग सुरू झाली होती. या चॅटिंगच्या माध्यमातून दोघेही एकमेकांच्या जवळ आले. या दरम्यान १२ जानेवारी २०२५ रोजी धुळे येथील निवासस्थानी त्या मुलीने शिक्षकांना भेटायला बोलाविले. 

घरी भेटायला बोलावत केला भयानक प्रकार 

शिक्षक आल्यानंतर मुलीच्या घरी भयानक प्रकार घडला. शिक्षक सदर मुलीला भेटायला घरी गेले असता त्या मुलीने तिच्या मोबाईलमध्ये विवस्त्र अवस्थेत शिक्षकासोबत व्हिडिओ काढले आणि त्या घरात अचानक तीन इसम दाखल झाले. त्यांनी शिक्षकाला शिवीगाळ करत त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत १२ लाख रुपयांची खंडणी मागितली. शिक्षक त्यादिवशी नंदुरबार येथे घरी परतले. तर १३ जानेवारी २०२५ रोजी घडलेला संपूर्ण प्रकार धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सांगितला. 

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ जानेवारीला दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरात सापळा रचत खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या चौघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी १४ जानेवारीला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास देवपूर पोलीस ठाण्यात धुळे येथील संशयित आरोपी मुलगी आणि खंडणी घेण्यासाठी ताब्यात घेण्यात आलेले धुळे येथील देवेश कपूर (वय १९), हितेश बिराडे (वय १९), विनय नेरकर (वय २३) आणि रावेर येथील हर्षल वाघ (वय २१) या पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manali Winter Tourism: हिवाळ्यात मनाली ट्रिप प्लान करताय? 'ही' आहेत 8 Hidden लोकेशन्स

Nagarparishad Election Result: भाजप नंबर १, कुणाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक? विभागनिहाय आकडेवारी वाचा

शिवसेनेचा बुरुज ढासळला; अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेत कमळ फुललं

Pear Benefits: थंडीत पेर खाल्ल्याने शरिराला होताता 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Nagar Palika Election Result Live: नांदगाव व मनमाड नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला, आमदार कांदेंकडून विजयी उमेदवारांचा सत्कार

SCROLL FOR NEXT