Nandurbar crime  Saam Tv
महाराष्ट्र

9 वर्षीय चिमुकलीवर नराधमाकडून बलात्कार करुन जीवेठार मारणाऱ्या 2 नराधमांना अटक

9 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन, जिवेठार केल्याची धक्कादायक घटना

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील हुनाखांब चेनवाईपाडा येथे आई- वडील होळी पाहण्यासाठी बाहेर गेले असतांना २ नराधमांनी संधी साधून ९ वर्षीय बालिकेवर बलात्कार (sexual assualt ) करुन, जिवेठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील २ संशयितांना पोलीसांनी (police) अटक करण्यात आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील हुनाखांब चेनवाईपाडा येथे १७ मार्च दिवशी होळी होती. गावातील (village) होळी पाहण्यासाठी जाण्यापूर्वी मुलांना जेवू घालून झोपवून दाम्पत्य होळी पाहण्यासाठी गेले होते.

हे देखील पहा-

मात्र, मध्यरात्री पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास २ आरोपींनी पिडीत मुलीच्या घरी गेले होते. ती झोपलेली असतांना रवि याने तिला घरातुन बळजबरीने उचलुन आणले. तिच्या घराच्या समोरील शेतात तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केला आहे. त्यानंतर त्या चिमुरडीने झालेली घटना तिच्या आई- वडिलांना सांगेल असे दोघांना सांगितले. तेव्हा दोन्ही आरोपी घाबरले व त्यांनी त्या चिमुरडीला शेतात (Farm) पडलेल्या दगडाने तोंडावर जबर मारहाण केली आहे. तसेच गळा देखील दाबला आहे. त्यामुळे ती जागेवरच मरण पावली आहे. त्यानंतर तिला उचलुन त्या मुलीच्या घरासमोर थोड्या अंतरावर असलेल्या एका महुच्या झाडाखाली घेवून जावून महुच्या पानांच्या खाली झाकुन टाकले होते.

२ दिवसांनी सदर चिमुरडीचा मृतदेह गावाजवळच्या महू झाडाखाली पानांमध्ये अर्ध नग्नावस्थेत पडलेली दिसली. तिच्या नाका- तोंडातून रक्तस्त्राव होत होता. तिच्या कपाळावर, डोळ्यावर आणि ओठावर गंभीर जखमा झालेल्या दिसत होते. मुलीला या अवस्थेत बघून आई- वडीलांचे अवसान गळाले होते. ग़ावकऱ्यांना याबाबत समजल्यावर तात्काळ मोलगी पोलीसांना कळविण्यात आले आहे. यावेळी मोलगी येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अमंलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

याप्रकरणी मयत चिमुकलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मोलगी पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपींनविरुध्द खून करून पुरावा नष्ट केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात ६ विविध पथके तयार करून आरोपी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Maharashtra Winter Alert : गुलाबी थंडीची चादर! मुंबई-पुण्यासह राज्याचा पारा घसरला, पावसानंतर गारठा वाढला

Local Body Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का, ठाकरे अन् शिंदेंचे शिलेदार फोडले

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

SCROLL FOR NEXT