Breaking: रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा

महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्याने पक्षातील पदावरून रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला
Rupali Chakankar
Rupali Chakankarsaam tv
Published On

रश्मी पुराणिक

पुणे: रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा (Ncp) राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Women commission president) आहेत. यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडले आहे. गेल्या विधानसभा (Assembly) निवडणुकीच्या अगोदर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला (NCP) रामराम ठोकला आहे. यानंतर सहाजिकच महिला प्रदेशाध्यक्ष पद देखील रिकामे झाले होते.

हे देखील पहा-

यानंतर रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना राष्ट्रवादीकडून महिला प्रदेशाध्यक्षापद देण्यात आले होते. आता महिला प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधून लागले आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाची सुत्र हाती घेताच अनेक मोठं- मोठी प्रकरणे हाताळली. यामुळे त्यांचे ते काम बघता त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्त्यावरच्या आंदोलनापासून ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीमध्ये रुपाली चाकणकर यांचे वेगळेपण बघायला मिळाले आहे. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं याकरिता रुपाली चाकणकर ओळखले जाऊ लागले आहेत. लग्नानंतर (marriage) सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचा देखील राजकारणात प्रवेश झाला होता.

Rupali Chakankar
"माझी इच्छा पूर्ण कर म्हणत" दिराने केला भाऊजईचा विनयभंग; गुन्हा दाखल

नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी हे उत्तम हाताळले आहे. आता त्यांच्यावर राज्य महिला आयोगाची भिस्त असणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com