"माझी इच्छा पूर्ण कर म्हणत" दिराने केला भाऊजईचा विनयभंग; गुन्हा दाखल

बीडच्या साक्षाळपिंप्री गावातील धक्कादायक घटना
Beed Crime
Beed Crimeविनोद जिरे
Published On

बीड: बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्नांवरून, विधानसभेच्या सभागृहात रणकंदन झालं. त्याचबरोबर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर, एक स्वतंत्र बैठक घ्यावी, असे पत्र गृहमंत्र्यांना दिल होते. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात मुंडे बहीण भावात कायदा आणि सुव्यवस्थेवर चांगलंच आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण तापलं आहे. त्यातच आता पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. चार दिवसांपूर्वी अंबाजोगाईत आठ वर्ष मुलीवर बलात्कार झाला.

आता साक्षळपिंपरी गावामध्ये चक्क पैशासाठी विवाहितेला मारहाण करत मानसिक त्रास देण्यात आला आहे. एवढचं नाही तर कुटुंबातील दिराने भावजयीची छेडछाड देखील काढली आहे. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत माझी इच्छा पूर्ण कर,.असे म्हणत छेडछाड करणाऱ्या दिरावर, भावजयीचा फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर मारहाण करत माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये, असं म्हणत मानसिक छळ करणाऱ्या, नवरा, सासू सासऱ्यांवर देखील मारहाण व ४९८ गुन्हा नुसार दाखल करण्यात आला आहे. ही घटना बीडच्या साक्षाळपिंप्री गावात उघडकीस आली आहे.

हे देखील पहा-

साक्षाळपिंप्री येथील पीडित २७ वर्षीय विवाहितेच्या फिर्यादीवरून, तिचे माहेर पाटोदा तालुक्यात असून, २०१२ मध्ये तिचा विवाह साक्षाळपिंप्री येथील आरोपी पतीशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस सुखाचा संसार झाला. मात्र, काही वर्षांनी याला पैशाच्या हव्यासापोटी ग्रहण लागले आहे. शेतीच्या कामासाठी २ लाख रुपये आणत नाही, म्हणून तसेच घरकाम व शेतातील काम नीट येत नाही, अशी कुरापत काढत मारहाण करु लागले होते. त्यामुळे पीडिता कधी माहेरी, तर कधी सासरी राहत असे. या दरम्यान गेल्या १५ दिवसांपूर्वी तडजोडीसाठी बैठक झाली होती. तेव्हापासून ती सासरी होती.

Beed Crime
जिल्हा परिषद शाळेतील फ्रीस्टाइल हाणामारी; मुख्याध्यापका समोर घडला प्रकार...(पहा Video)

या दरम्यान माझी इच्छा पूर्ण कर म्हणत सख्या दिराने तिचा विनयभंग केला आहे. पीडितेने आरडा- ओरड केल्यावर जिवे मारण्याची धमकी दिली आहे. अशा आशयाची फिर्याद २७ वर्षीय पीडित विवाहितेने दिली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिरावर विनयभंगाचा तर पतीसह सासू, सासरा, दिर यांच्यावर मारहाणीचा गुन्हा नोंद झाला आहे. अशी माहिती बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने, मुंडे बहीण भावात आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण सुरू असतानाच, महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. त्यातच आता पैशासाठी विवाहितेला होणारी मारहाण आणि कुटुंबात देखील महिला सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने, पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com