नांदेड: नांदेडच्या मालेगावातील जिल्हा परिषद शाळेतील फ्रीस्टाइल हाणामारीचा (fighting) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्याध्यापकांचे दालन कुस्तीचा आखाडा तर बनला नाही ना असाचं काहींसा प्रश्न आपल्याला आपण पाहत असलेल्या व्हिडीओमुळे (video) पडणार आहे. नांदेड (Nanded) पासून जवळच असलेल्या मालेगावच्या (Malegaon) जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पहा व्हिडिओ-
शालेय समितीचे अध्यक्ष परमेश्वर इंगोले आणि माजी उपसरपंच सिध्दार्थ वाघमारे अचानक फ्रीस्टाइल (freestyle) हाणामारीच्या या घटनेमुळे मुख्याध्यापक सुनिल सुर्यवंशी यांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली होती. हाणामारीची संपुर्ण घटना सिसीटीव्ही (CCTV) कैद झाले आहे. मालेगाव चे उपसरपंच मंगळवारी सकाळी शाळेत निर्गम उतारा काढण्यासाठी आले होते. त्यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष परमेश्वर इंगोले मुख्याध्यापकाच्या कक्षात आले होते.
कुठल्यातरी कारणावरुन वाघमारे आणि इंगोले यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, दोघांत फ्रीस्टाइल हाणामारी सुरु झाली होती. शाळा सुरू असताना घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या प्रकरणी वाघमारे आणि इंगोले यांनी पोलिस ठाण्यात परस्परविरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्ञानदानाची शाळा कुस्तीचा आखाडा बनल्याने सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.