nandurbar collector 
महाराष्ट्र

जिल्हाधिकारी मनीषा खत्रींचे शेतातील मजूरांशी संवाद; लसीकरण प्रमाणपत्राचीही तपासणी

जिल्हाधिकारी मनीषा खत्रींचे शेतातील मजूरांशी संवाद; लसीकरण प्रमाणपत्राचीही तपासणी

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : कोरोना विषाणुसह त्याचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात आजपासून तीन दिवसीय विशेष लसीकरण मोहीम राबविण्यास सुरवात झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज थेट कोळदा- खेतिया मार्गावर थांबत प्रवाशांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पाहणी करीत लसीकरण करून घेण्याचे नागरिकांना आवाहन केले. (nandurbar-Collector-Manisha-Khatri-interacts-with-farm-laborers-Also-check-the-vaccination-certificate)

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढावे; म्हणून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून तीन दिवसीय विशेष मोहिम राबविण्यास सुरवात झाली. या मोहिमेत जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्यासह सर्वच वरीष्ठ अधिकारी सहभागी झाले असून ते नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करीत आहेत. त्यानुसार आज जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्यासह सर्वच अधिकारी गाव-पाड्यापर्यंत पोहोचले.

लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी आज सकाळी शहादा तालुक्यातील कोळदा- खेतिया मार्गावर थांबत वाहनांमधील प्रवाशांची तपासणी करीत लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. ज्यांचा पहिला डोस घेवून दुसरा डोस करीता कालावधी पूर्ण झाला असेल त्यांनी तातडीने दुसरा डोस घ्यावा. ‘ओमायक्रॉन’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी आवाहन केले.

मजुरांशी संवाद

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी डामरखेडा शिवारातील कापसाच्या शेतातील मजुरांशी संवाद साधला. त्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत आदी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Weight Loss: वजन वाढलयं तरी योगा किंवा एक्सरसाईज करायला आळसपणा करताय? मग होऊ शकतात हे गंभीर त्रास

Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल का? जाणून घ्या नियम

SCROLL FOR NEXT