Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

Shreya Maskar

कर्जत

सह्याद्री पर्वतरांगांमधील अनेक आकर्षक थंड हवेची ठिकाणे आणि शिखरांवरील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी कर्जत हे सुंदर लोकेशन आहे. तुम्हाला येते उन्हाळ्यात थंडगार वातावरण अनुभवता येते.

Karjat | google

माथेरान

माथेरान हे सर्वात जवळचे हिल स्टेशन आहे. जे आशियातील एकमेव वाहनमुक्त थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे प्रदूषणमुक्त निसर्ग भ्रमंतीचा आनंद घेऊ शकता.

Matheran | google

लोणावळा -खंडाळा

सर्वात लोकप्रिय जुळी थंड हवेची ठिकाणे म्हणजे लोणावळा- खंडाळा होय. यांच्याजवळ अनेक ऐतिहासिक किल्ले देखील आहे. तसेच हिरवीगार दरी, धबधबे आणि टायगर पॉईंट व ड्यूक्स नोजसारखी निसर्गरम्य ठिकाणे आहेत.

Lonavala and Khandala | google

माळशेज घाट

माळशेज घाट ही महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमधील एक अत्यंत नयनरम्य पर्वतीय खिंड आहे. येथून कोसळणारे धबधबे पाहून तुम्ही भारावून जाल. येथे सुंदर पक्षी देखील पाहायला मिळतात.

Malshej Ghat | google

भीमाशंकर

भीमाशंकर हे पश्चिम घाटाने वेढलेले ठिकाण आहे. समृद्ध जैवविविधतेसाठी आणि हिरव्यागार वन्यजीव अभयारण्यासाठीही ओळखले जाते. भीमाशंकर हे भीमा नदीचे उगमस्थान म्हणून सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.

Bhimashankar | google

इगतपुरी

सह्याद्रीमध्ये उत्तरेकडे इगतपुरी हे हिल स्टेशन वसलेले आहे. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करू शकता. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Igatpuri | google

पेठ किल्ला

पेठ किल्ला हा कर्जतच्या पूर्वेला साधारण २२ किलोमीटर अंतरावर वसलेला एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य किल्ला आहे. ३,१०० फूट उंचीवर असलेला हा किल्ला ट्रेकर्ससाठी अत्यंत लोकप्रिय आहे. पेठ किल्ल्याला कोथळीगड असेही म्हणतात.

Peth Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | google

NEXT : ना नारळ ना टोमॅटो; साऊथ इंडियन नाश्त्यासोबत स्वादिष्ट लागते 'ही' चटपटीत चटणी, बनवायला खूपच सोपी

South Chutney Recipe | saam tv
येथे क्लिक करा...