South Chutney Recipe : ना नारळ ना टोमॅटो; साऊथ इंडियन नाश्त्यासोबत स्वादिष्ट लागते 'ही' चटपटीत चटणी, बनवायला खूपच सोपी

Shreya Maskar

साउथ इंडियन नाश्ता

'गनपावडर' म्हणून सर्वत्र ओळखली जाणारी 'पोडी चटणी' ही एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय सुकी मसाल्याची पूड आहे. डोश्यासोबत ही चटणी खूपच भारी लागते. तुम्ही घरीच ५ मिनिटात ही चटणी बनवू शकता.

South Indian Breakfast | google

इडली-डोसा

पोडी चटणी डाळी, मिरच्या आणि विविध मसाले भाजून तयार केले जाते. ही सहसा तिळाचे तेल किंवा तुपाबरोबर मिसळून इडली आणि डोशांसोबत वाढली जाते.

Idli-Dosa | pinterest

पोडी चटणी

पोडी चटणी बनवण्यासाठी डाळी, उडीद डाळ, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता , हिंग, सुके खोबरे, चिंच, गूळ आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Podi Chutney | pinterest

डाळी

पोडी चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम डाळी भाजून घ्या. एका पॅनमध्ये मध्यम-मंद आचेवर १ चमचा तेल गरम करा.

Lentils | pinterest

उडीद डाळ

चणा डाळ आणि उडीद डाळ वेगवेगळ्या भाजून घ्या, जोपर्यंत त्यांचा रंग सोनेरी-तपकिरी होत नाही आणि त्यातून खमंग सुगंध येत नाही.

Urad Dal | pinterest

कढीपत्ता

भाजलेल्या डाळी थंड करा. त्यानंतर मिरच्या आणि कढीपत्ता भाजून घ्या. पुन्हा त्याच पॅनमध्ये १ चमचा तेल घालून सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता परतून घ्या.

Curry Leaves | pinterest

खोबरे

जोपर्यंत मिरच्या थोड्या फुगत नाहीत आणि कढीपत्ता कुरकुरीत होत नाही तोवर परता. त्यानंतर खोबरे हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या.

Coconut | pinterest

गूळ

भाजलेले सर्व साहित्य (डाळी, मिरच्या, कढीपत्ता आणि मसाले, खोबरे) एका मिक्सरमध्ये वाटून घ्या. तसेच यात चिंच, गूळ आणि मीठ देखील घाला. हे मिश्रण जाडसर किंवा बारीक पावडर होईपर्यंत वाटून घ्या. यात एकही पाण्याचा थेंब नको.

Jaggery | pinterest

NEXT : गोड खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा 'हा' शुगर फ्री हलवा, मधुमेही रूग्णही आवडीने खातील

Sugar Free Sweet Recipes | saam tv
येथे क्लिक करा...