Shreya Maskar
मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाचणी हे एक सुपरफूड मानले जाते. नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे ती खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
तुम्हाला जर खूपच गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही नाचणीच्या पीठाचा शुगर फ्री हलवा बनवू शकता. यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहील आणि तुमची गोड खाण्याची इच्छा देखील पूर्ण होईल.
नाचणीचा हलवा बनवण्यासाठी नाचणीचे पीठ, दूध, सुकामेवा, वेलची पूड, तूप आणि गूळ इत्यादी साहित्य लागते. मात्र याचे योग्य प्रमाण घ्या.
नाचणीचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये काही थेंब तूप घाला आणि त्यात नाचणीचे पीठ मंद आचेवर परतून घ्या. सतत पीठ ढवळत रहा, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही.
सोनेरी तपकिरी होईपर्यंत नाचणी ५ मिनिटे परता. नंतर पीठात दूध घालून २-३ मिनिटे सतत ढवळत रहा आणि चांगले शिजवा.
नाचणी चांगली शिजली की, त्यात वेलची पूड आणि थोडा गूळ मिक्स करा.
गूळ हा साखरेला उत्तम पर्याय आहे. तुम्ही खजुराचा गूळ वापरू शकता. कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा कमी असतो.
शेवटी बारीक चिरलेला सुकामेवा घालून हलवा चांगला मिक्स करा. त्यानंतर सुमारे एक मिनिट हलवा शिजवा आणि नंतर गॅस बंद करा.