Shreya Maskar
बटाट्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो आणि त्यात स्टार्चचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बटाटे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
स्वीट कॉर्नचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, परंतु त्यात कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मक्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढू शकते. म्हणूनच मधुमेहींना स्वीट कॉर्न अत्यंत मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
रताळे खाल्ल्याने मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असला तरी मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ होऊ शकते.
भोपळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेत झपाट्याने वाढ होऊ शकते. भोपळ्यामध्ये पिष्टमय पदार्थ (स्टार्च) असतात, जे रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतात.
कंदभाज्या या थोड्या गोड असतात त्यामुळे ते खाणे टाळावे. बीट आणि गाजरमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असू शकते त्यामुळे त्यांचे सेवन प्रमाणात करावे.
आपल्या आहारात अशा भाज्यांचा समावेश करा ज्यात स्टार्चचे प्रमाण कमी असते आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, यामुळे शरीरातील साखरेची पातळ वाढत नाही.
हिरव्या पालेभाज्या मधुमेही रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यामध्ये कमी कॅलरीज, कमी कर्बोदके आणि भरपूर फायबर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.