Shreya Maskar
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. नियमित शारीरिक हालचाली आणि औषधांचे काटेकोर सेवन करा. मद्यपान आणि धूम्रपान कमी करा.
वजन नियंत्रणात ठेवा. ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवणे, तणाव कमी करणे आणि साखरेची पेये टाळणे यासर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
रक्तातील साखर तपासण्यासाठी हात धुणे, मीटरमध्ये टेस्ट स्ट्रिप घालणे, लॅन्सेट नावाच्या सुईने बोटाच्या टोकाला टोचणे आणि ती स्ट्रिप रक्ताच्या थेंबाला लावणे या क्रिया केल्या जातात.
मीटर काही सेकंदात निकाल दाखवतो. हात धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा, कारण स्वच्छ आणि उबदार हातांमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि अचूकता वाढते, तसेच अन्न किंवा इतर पदार्थांमुळे होणारा संसर्ग टाळता येतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखर तपासण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी उठल्यावर (उपाशीपोटी), जेवणापूर्वी आणि जेवणानंतर १-२ तासांनी, जेणेकरून अन्न आणि औषधांच्या परिणामांवर लक्ष ठेवता येईल.
जेवणानंतर १ ते २ तासांनी तुम्ही डायबिटीज चेक करू शकता. यामुळे विशिष्ट खाद्यपदार्थांचा तुमच्या रक्तातील साखरेवर कसा परिणाम होतो हे समजते.
रक्तातील साखरेची तपासणी साधारणपणे जेवणानंतर लगेचच , तणावाखाली असताना किंवा आजारी असताना, अथवा तीव्र व्यायाम केल्यानंतर लगेचच करू नये.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.