Shreya Maskar
तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. यामागे मुख्य कारणे म्हणजे, बदलती जीवनशैली, स्मार्टफोन, डिजिटल उपकरणे, जंक फूड, व्यायामाचा अभाव
अनेक तरुण व्यायामाला टाळाटाळ करतात. तसेच ऑफिसमध्ये तासनतास बसून काम करतात, ज्यामुळे त्यांची हालचाल होत नाही. परिणामी लठ्ठपणा येतो आणि वजन वाढते. ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकतेचा धोका वाढतो, जो टाईप २ मधुमेह होण्यामागील एक प्रमुख घटक आहे.
प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि फास्ट फूड, जंक फूडमुळे तरुणांमध्ये मधुमेहाचा धोका वाढतो. या पदार्थांमध्ये साखर आणि अनहेल्दी चरबी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते.
तरुणांमध्ये आणि अगदी लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि त्यामुळे होणाऱ्या टाइप २ मधुमेहाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. वजन नियंत्रणात राहण्यासाठी शरीराची हालचाल होणे खूप गरजेचे आहे.
शरीरातील अतिरिक्त चरबी, विशेषतः पोटाभोवती इन्सुलिन प्रतिरोध वाढवू शकते. अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव तरुण लोकांमध्ये लठ्ठपणास कारणीभूत ठरत आहे, ज्यामुळे मधुमेहामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
मुलांनी ताणतणाव कमी घ्या. तसेच दीर्घकाळचा ताण आणि झोपेच्या अभावामुळे हार्मोनची पातळी बिघडू शकते, ज्यामुळे वजन वाढतो आणि मधुमेहाचा धोका उद्भवतो. तरुणाईमध्ये मधुमेह होण्याचा एक घटक म्हणजे आनुवंशिकता होय.
तरुणांमध्ये टाइप २ मधुमेह रोखण्यासाठी जीवनशैली बदला. दररोज ६० मिनिटांहून अधिक काळ शारीरिक व्यायाम, तंतुमय पदार्थांनी समृद्ध आणि साखरेचे प्रमाण कमी असलेला संतुलित आहार खा. वजन नियंत्रणात ठेवा. एकाच जागी बसून स्क्रीनसमोर घालवला जाणारा वेळ मर्यादित करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.