Shreya Maskar
तुम्हाला जर डायबिटीज असेल आणि तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही काही गोड पदार्थ खाऊन मनाला शांत करू शकता. मात्र कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, गोड खाताना त्याचे प्रमाण अगदीच कमी असले पाहिजे.
बेरी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, नाशपाती आणि रास्पबेरी सारखील हेल्दी फळे खाऊ शकता. कारण यात फायबरचे प्रमाण जास्त आणि साखरेचे प्रमाण कमी असते. गोड खाणे पूर्णपणे बंद करण्यापेक्षा, त्याचे प्रमाण कमी करा.
मधुमेहाचे रुग्ण डार्क चॉकलेट खाऊ शकतात. तुम्ही किमान ७०% कोको (Cocoa) असलेले डार्क चॉकलेट खाऊ शकतात कारण त्यात साखरेचे प्रमाण कमी, फ्लेव्होनॉइड्स (Antioxidants) भरपूर असते, जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवून, हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करतात.
दही , पनीर , ताक हे पदार्थ खाऊ शकता. कमी चरबीयुक्त दुधापासून बनवलेले पनीर, मर्यादित प्रमाणात खाऊ शकता. साधे, साखर नसलेले किंवा ग्रीक योगर्ट सर्वात चांगले मानले जाते.
रिकाम्या पोटी गोड खाल्ल्यास साखरेची पातळी वेगाने वाढते. जेवल्यानंतर, विशेषतः दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच गोड पदार्थ खाल्ल्यास साखरेचे शोषण सावकाश होते.
गोड पदार्थ किंवा गोड खाल्ल्यानंतर १०-१५ मिनिटे वेगाने चालल्यास स्नायू अतिरिक्त साखरेचा वापर करतात, ज्यामुळे साखरेची पातळी कमी राहण्यास मदत होते.
दिवसभरात पुरेसे पाणी प्यायल्याने अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते, ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.