Bajar Samiti Election Saam tv
महाराष्ट्र

Bajar Samiti Election: नंदुरबारमध्ये शिंदे गट, भाजपा समोरासमोर

नंदुरबारमध्ये शिंदे गट, भाजपा समोरासमोर

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणुक सुरू आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी (Nandurbar News) अर्ज भरताना सर्व राजकीय पक्षांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. यात (BJP) भाजप व शिंदे गटाच्‍या उमेदवारांनी विरोधात अर्ज दाखल केल्‍याने निवडणुका रंगतदार होणार असल्‍याचे चित्र तयार झाले आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार बाजार समिती शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या ताब्यात असून बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी भाजप नेते आणि पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी सर्व ताकद प्रणाला लावली आहे. तर खासदार हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित आणि मंत्री विजय गावित यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत (Bajar Samiti Election) जिल्ह्यात आणि नंदुरबारमध्ये चांगली चुरस पाहण्यास मिळत आहे. नंदुरबार बाजार समितीत ९३ जणांनी आपले नामांकन दाखल केले आहे. बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र असून अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या डोकेदुखी ही वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Union Budget 2026 : शाळेतच मिळणार रिल्स बनवण्याचे धडे, कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना

Rohit Shetty House Firing: 'पुढच्या वेळी, छातीवर गोळी...'; रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी कोणी घेतली?

NCP President : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण? प्रफुल्ल पटेलांचं नाव घेणारे पियुष गोयल यांची दिलगिरी; म्हणाले, दिशाभूल...

Maharashtra Live News Update: बजेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातला वाटा जास्त - बच्चू कडू

Crime: ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, २४ वर्षीय तरुणाचं भयंकर कृत्य; घरासमोरून अपरहण केलं, नंतर...

SCROLL FOR NEXT