Akkalkuwa News Saam tv
महाराष्ट्र

Akkalkuwa News : मृत्यूनंतरही मरण यातना संपेना; पुराच्या पाण्यातून काढावी लागते अंत्ययात्रा

Nandurbar News : सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने नद्यांना पूर असल्याने यातून मार्ग काढत जावे लागत असते. अशात एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी देखील नदीतून मार्ग काढावा लागत असतो

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या नशिबी मृत्यूनंतरही वेदना संपत नसल्याचे भीषण वास्तव पाहण्यास मिळत आहे. धड रस्ते नाहीत कि अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही. यामुळे या आदिवासी बांधवाना कमरे इतक्या पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जीव धोक्यात असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. 

नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील मोरांबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रोजकुंड गावात ही दुर्देवी घटना समोर आली आहे. या गावानुसारच नंदुरबार जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाडे, वस्त्यांवर पुरेशा सुविधा नाहीत. रस्ते नसल्याने त्रास सहन करावा लागत असतो. तर सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने नद्यांना पूर असल्याने यातून मार्ग काढत जावे लागत असते. अशात एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी देखील नदीतून मार्ग काढावा लागत असतो. 

प्रशासनाची उदासीनता 

रोजकुंड या गावात नदीला पूल आणि रस्ता नसल्याने नातेवाईकांना पुराच्या पाण्यातून मृतदेह घेऊन जाण्याची वेळ आली आहे. यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोजकुंड गावातील ग्रामस्थ नदीवर पूल आणि रस्त्यासाठी मागणी करत आहेत. मात्र त्यांची ही मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. 

पुराच्या पाण्यातून मार्ग 

दरम्यान अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात स्मशानभूमी देखील नाही. यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावाच्या बाहेर जावे लागत असते. अशात मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने नदी- नाल्यांना पूर आला आहे. यामुळे कमरेपर्यंत असलेल्या पुराच्या पाण्यातून मृतदेह खांद्यावर घेऊन मार्ग काढावा लागल्याचे पाहण्यास मिळाले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brocoli Benefits For Hair Growth: केस ओढले तरी तुटणार नाहीत, हिरवी भाजी ठरेल वरदान, खाण्यापूर्वी फायदे जाणून घ्या

Cell Broadcast Alert: घाबरू नका! तुमच्या मोबाइलवर वाजणार सायरन; वाचा काय करावे लागेल?

Maharashtra News Live Update : बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू, रुग्णांना मोठा दिलासा

Amruta Fadnavis Naman Tula Song: महाराष्ट्र दिनी शिवरायांना अभिवादन; अमृता फडणवीसांचं 'नमन तुला' गाणं रिलीज

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण वाहतूककोंडी; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, शेकडो लोकांना फायदा

SCROLL FOR NEXT