Manasvi Choudhary
पावसाळा म्हटलं की भजीचा बेत झाला पाहिजे. पावसाळ्यात गरमा गरम भजी खायची मज्जा काहीशी वेगळीच असते.
अनेकजण घरी कांदा भजी बनवतात पण तुम्हाला माहितीये का तुम्ही मिक्स बटाटा भजी बनवली तर लहानमुले देखील आवडीने खातील.
बटाटा भजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्याघरी बनवू शकता.
बटाटा भजी बनवण्यासाठी बटाटे, वेसन, तांदळाचे पीठ, मसाला, हळद, ओवा, खाण्याचा सोडा, तेल हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल मसाला, हळद, ओवा, खाण्याचा सोडा हे मिश्रण मिक्स करा.
मिश्रणात थोडेसे पणी घालून घट्ट मिश्रण करा. पीठ जास्त पातळ, जास्त घट्ट होणार नाही याची काळजी करा. त्यानंतर या मिश्रणात बटाट्याच्या गोलाकार चकत्या मिक्स करा.
गॅसवर कढईमध्ये गर तेलामध्ये बटाट्याच्या चकत्या एक एक करून सोडा. मध्यम आचेवर भजी दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यत तळून घ्या.
अशाप्रकारे घरच्या घरी पावसाळ्यात गरमा गरम बटाटा भजीचा आनंद घ्या.