Manasvi Choudhary
मे महिना संपताच जूनला सुरूवात झाली की पर्यटकांची गर्दी होते ते ठिकाण म्हणजे माळशेज घाट.
पावसाळ्याला सुरूवात होताच माळशेज घाट येथे पर्यटकांची गर्दी होते. निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येथे पर्यटक भेट देतात.
परंतू तुम्हाला माळशेज घाट येथे गेल्यानंतर कोणत्या कोणत्या ठिकाणांना भेट द्यावी हे माहिती नसेल तर ही वेबस्टोरी पूर्ण वाचा.
माळशेज घाटपासून १८ किलोमीटरवर पिंपळगाव जोगा धरण आहे. सूर्यास्त पाहण्यासाठी येथे गर्दी होते.
सह्याद्रीतील सर्वात लोकप्रिय आणि साधारणपणे ६ व्या शतकात बांधलेला ऐतिहासिक हरिश्चंद्रगड किल्ला माळशेज घाट परिसरातच आहे.
सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर म्हणजे आजोबा हिल फोर्ट आहे. पावसाळ्यात या किल्ल्यावरून आजूबाजूच्या दऱ्यांचे आणि निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते.
माळशेज घाटातील हिरवं सौंदर्य, धबधबे पाहण्यासाठी तुम्ही पावसाळ्यात नक्की भेट द्या.