Nandurbar Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

Nandurbar Accident News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात लांबोळा गावाजवळ प्रवासी टॅक्सी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जण जखमी असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • नंदुरबार-शहादा मार्गावर टॅक्सी-ट्रकची भीषण धडक

  • अपघातात पाच जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

  • वाहनांचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर

  • पोलिसांकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू

नंदुरबारमध्ये भीषण अपघात झाला आहे. नंदुरबारहुन शहादाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी टॅक्सी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत ५ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत गाडीचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास शहादा तालुक्यातील लांबोळा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. नंदुरबारहुन शहादाच्या दिशेने एक प्रवासी टॅक्सी जात होती. त्याच सुमारास मालवाहू ट्रक सुद्धा त्याच मार्गावरून जात होता. यादरम्यान दोघांची जोरदार धडक झाल्याने दुर्दैवी अपघात झाला.

हा अपघात इतका भीषण होता की टॅक्सी आणि ट्रकचा चक्काचूर झाला. शिवाय या दुर्घटनेत पाच जण जखमी असून २ जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. काही काळ घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र हा अपघात कशामुळे झाला? हे अद्यापही समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT