Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: मद्यधुंद तरूणांची दुचाकीला धडक; पती-पत्नीचा मृत्यू

मद्यधुंद तरूणांच्या दुचाकीला धडक; पती-पत्नीचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

चिंचपाडा (नंदुरबार) : खांडबारा येथून दुचाकीने बाजार करून मोठे कडवान येथे परतणाऱ्या शेतकरी (Farmer) दांम्प्त्यांच्या दुचाकीला मद्यधुंद तिघा तरूणांच्या दुचाकीने मागून जोरदार धडक (Accident) दिली. यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्‍यू झाला. (Letest Marathi News)

विसरवाडी खांडबारा रस्त्यावरील खातगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. मोठे कडवान येथील शेतकरी राजेश सखाराम गावित (वय ४५) हे पत्नी इंदिरा गावित (वय ४०) यांच्‍यासह दुचाकीने खांडबारा येथून बाजार करून आपल्या शेतातील घराकडे जात होते. त्याचवेळी खातगाव येथील तिघे तरूण किरण किसन वळवी (वय १८), अमोल वळवी (वय २५), सूरज गावित (वय २२) हे दुचाकीने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने येत होते.

मागून जोरदार धडक

प्रत्यक्षदर्शींनी ते भेलकांडत दुचाकी चालवित असल्याचे व मद्याच्या नशेत असल्याचे सांगितले. त्यांनी राजेश गावित यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने राजेश व इंदिरा गावित रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यात ते गंभीर जखमी झाले. १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. मात्र उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. धडक देणारे तिघे तरूण दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनाही पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविले आहे.

कठोर कारवाईची मागणी

मृताच्या नातेवाइकांनी आक्रोश केला. त्यांच्या पश्‍चात आई, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. पल्सरवरील तरुणांनी शेतकरी पती-पत्नीला अपघातात जखमी करून ठार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक व मोठे कडवान ग्रामस्थांनी केली आहे. पोलिस चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करूत असून त्यानंतर गुन्हा नोंदविला जाणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT