Nandurbar Car Accident News Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar Accident : भयंकर! चालकाला हृदयविकाराचा झटका, अलिशान कारने तिघांना चिरडलं; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू

Nandurbar Car Accident: नंदुरबारच्या मिरज सिनेमाजवळ कोकणी हिल परिसरात अपघाताची घटना घडली. भरधाव कारने तिघांना चिरडले. नवापूर महामार्गावर आज सकाळी ही भीषण अपघाताची घटना घडली.

Priya More

सागर निकवाडे, नंदुरबार

नंदुरबारमधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. कार चालवताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे कार अनियंत्रित झाली. या कारने चौघांना चिरडले. या भीषण अपघातमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नंदुरबार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबारच्या मिरज सिनेमाजवळ कोकणी हिल परिसरात कारचा भीषण अपघात झाला. नवापूर महामार्गावर आज सकाळी ही भीषण अपघाताची घटना घडली. कार चालवाताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा कारमध्येच मृत्यू झाला. त्यामुळे भरधाव कार अनियंत्रित झाली. या कारने तिघांना चिरडले. या अपघातामध्ये कार चालकासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर एक महिला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला.

अनियंत्रित कारने धडक दिल्यामुळे भंगार विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. भंगार विक्रेत्या सायकलवरून जात असताना कारने त्याला धडक दिली. या कारने रस्त्याच्या कडेने पायी जाणाऱ्या आई आणि १२ वर्षांच्या मुलाला देखील चिरडले. या अपघातामध्ये हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वाहन चालकाचा देखील मृत्यू झाला.

या अपघातामध्ये रज्जाक खान (६० वर्षे) या भंगार विक्रेत्याचा मृत्यू झाला. तर कारचालक तारीख खान यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या अपघातामध्ये मनीषा पवार आणि त्यांचा मुलगा गोलू पवार गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास नंदुरबार पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

Maharashtra Politics : माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद राहणार की जाणार? साडेसाती टाळण्यासाठी कृषीमंत्री शनिचरणी?

Maharashtra Live News Update: पावसाळ्यात बीडमधील रस्त्यांची दयनीय अवस्था; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यातील पाण्यात "होडी चलाव" आंदोलन

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

SCROLL FOR NEXT