भंडारा: ऐकावे ते नवलच! बुलढाणा, जळगाव, नाशिक नंतर आता भंडारा (Bhandara ) जिल्ह्यात मंदिरातील नंदी पाणी पिऊ लागल्याची अफवा पसरली असून नंदी पाणी पित असल्याच्या व्हिडिओ (Video) सध्या वायरल झाल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी मंदिराकडे (temple) होत आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील सालाई बुजुर्ग गावात घडली असून ह्या घटनेमुळे २७ वर्षपूर्वी गणपती दूध पित असलेल्या अफवेची आठवण झाली आहे. आता वाढती गर्दी लक्षात घेता अंधश्रद्धा निर्मूलन समिती सालाई बुजुर्ग गावात (village) येऊन पोहचली आहे. याचे वैज्ञानिक कारण आता ते गावकऱ्यांना (villagers) पटवून देत आहे. (Nandi is drinking lot water in temple in Bhandara Video Viral)
पहा व्हिडिओ-
यामुळे आता या घटनेच्या प्रतिक्रिया समाज माध्यमावर उमटू लागल्या असुन कोणी त्याला श्रद्धा तर कोणी अंधश्रद्धा म्हणू लागले आहे. मोहाड़ी (Mohadi) तालुक्यातील सालाई बुजुर्ग गावात असलेल्या सामुदायिक प्रार्थना मंदिरात काल काही मुलांनी शंकराच्या पिंडी समोर असलेल्या नंदिला चम्मचने पाणी पाजले आहे. यामध्ये नंदीने पाणी पिल्याने हा चमत्कार समजून त्या मुलांनी समाज माध्यमांवर या घटनेचे व्हिडिओ वायरल (Viral) केले आहेत. व्हिडिओ वायरल होताच आता दगडाचा नंदी पाणी पित असल्याच्या अफवेने सालाई बुजुर्ग गावाचा आसपासच्या लोकांनी दर्शनासाठी झुंबड उडविली आहे.
हे देखील पहा-
इतकेच क़ाय आसपास गावातील लोकांनी हा प्रयोग आपल्या गावातील मंदिरात देखील करुन बघितला आहे. सारखाच परिणाम मिळाल्याने मंदिरांमध्ये अचानक भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नंदी पाणी पित असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ही अफवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कानावर येताच, समितिचे सदस्य सालाई बुजुर्ग गावात पोहताच त्यांनी नंदी पाणी पीत असलेल्या घटनेचे वैज्ञानिक कारण देत हा दैवी चमत्कार नसल्याचे पटवून देण्यास सुरुवात केली आहे. अनिसचा मतानुसार ही घटना केवळ सरफेस टेंशन या नियमानुसार होत असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे नंदी पाणी पित असल्याचे समितीने गावक़ऱ्यांवर समजवुन सांगितले आहे. विशेष म्हणजे भंडाऱ्याच्या घटनेमुळे २७ वर्षांपूर्वी गणपती दूध पित असल्याच्या अफवेची आठवण झाली आहे. त्यामुळे नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, बुलढाणा आता नंतर भंडारामध्ये या घटनेमुळे मंदिरामध्ये भाविकांची गर्दी मात्र होऊ लागली आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.