nanded news  saam tv
महाराष्ट्र

Nanded News : डीजे समोर नाचण्यास रोखणं जीवावर बेतलं; चिडलेल्या टोळक्याकडून तरुणाची निर्घृण हत्या

वलिमाच्या कार्यक्रमात डिजे समोर नाचण्यास रोखणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे

साम टिव्ही ब्युरो

संतोष जोशी

Nanded Crime News : वलिमाच्या कार्यक्रमात डिजे समोर नाचण्यास रोखणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. चिडलेल्या टोळक्याने एका तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री नांदेडमध्ये ही घटना घडली आहे. शेख मोईस असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. (Latest Marathi News)

वलिमाच्या कार्यक्रमात डिजे समोर नाचण्यास रोखल्याने टोळक्याने शेख मोईस नावाच्या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शेख मोईसच्या नातेवाईकांनी थेट विमानतळ पोलीस ठाण्यातच मृतदेह आणला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्याने वातावरण निवळले. नांदेड (Nanded) शहरातील कर्मवीर नगर भागात शेख नदीम याचा वलिमाचा कार्यक्रम होता.

नेमकं काय घडलं ?

या कार्यक्रमाला नातेवाईक, गल्लीतील लोक आले होते. यावेळी सहा ते सात जणांचे टोळके दुचाकीवर आले. त्यांनी वलिमाच्या ठिकाणी सुरू असलेल्या डीजेच्या समोर नाचत धिंगाणा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेख नदीमचा भाऊ शेख मोईस आणि मित्रांनी टोळक्याला डीजे समोर नाचण्यास रोखलं. त्यामुळे टोळक्याने वलिमाच्या ठिकाणी राडा घालत शेख मोईसच्या पोटात धारधार शस्त्राने वार केला. जखमी मोईसला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी शेख मोईसच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट; होडगी रोड पाण्याखाली

पार्कमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या; बॅटनं मारलं अन् गोळ्या झाडल्या, CCTVतून मारेकऱ्याची ओळख पटली

Cancer Alert: आताच सावध व्हा! नकळत या गोष्टींमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

Who is Petal Gahlot: जगासमोर पाकच्या पंतप्रधानांचे तोंड बंद केलं, खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गहलोत कोण आहेत?

Vastu Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडतात? जाणून घ्या शास्त्र

SCROLL FOR NEXT