Nanded Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : महाराष्ट्र हादरला! अभ्यासासाठी मित्राच्या रूमवर गेली, मृतदेह आढळला, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Nanded Crime News : नांदेडमधील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मित्रावर गुन्हा दाखल झाला असून नातेवाईकांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

नांदेडमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू

मित्र माधव काळेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

नातेवाईकांचा हत्या केल्याचा दावा

आत्महत्या की हत्या यावर अजूनही गूढ कायम

साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच नांदेड मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमध्ये उच्चशिक्षित तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणीच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत असून परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील मृत मुलीचे नाव शीतल मोरे आहे

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शीतल मोरे ही नांदेड तालुक्यातील पांगरी येथील माधव काळे नावाच्या मित्राच्या रूमवर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेली होती. शीतल घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र माधव काळे नावाच्या मित्राच्या रूमवर शीतलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त नातेवाईक रात्री उशिरा पोलीस ठाण्यात जमले होते. विविध संघटनांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणीचा मित्र आरोपी माधव काळेवर नांदेड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

यातील तरुणीची हत्या करून आत्महत्येचा बनाव केल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून त्यामुळे शीतल मोरेचे छत्रपती संभाजीनगर येथे पुन्हा पोस्टमार्टेम करण्यात आले आहे.दरम्यान खरचं शीतलने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली हे अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून लवकरच या घटनेचा उलगडा होईल असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper : वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढच्या महिन्यात धावणार, बुलेट ट्रेनवरही रेल्वे मंत्र्यांचे मोठं वक्तव्य

Vivah Muhurat 2026 Date: सनई चौघडे वाजणार! २०२६ मध्ये लग्नासाठी ५९ शुभ मुहूर्त, आताच तारखा बघून घ्या...

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदची निवडणूक रद्द होण्याची शक्यता

Famous Director Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, ५३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Political News : शिंदेंचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच दादांनी पळवला, भोरमध्ये महायुतीत संघर्ष टोकाला

SCROLL FOR NEXT