Nanded School Holiday News Saam Tv
महाराष्ट्र

School Holiday : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नांदेडमध्ये सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, वाचा कारण

Nanded School Holiday News : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा आदेश दिला आहे.

Alisha Khedekar

  • नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर

  • हिंद दी चादर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

  • देश-विदेशातून हजारो भाविक नांदेडमध्ये दाखल होणार

  • वाहतूक, सुरक्षा व व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज

  • मोदी मैदानावर ५० एकरवर भव्य मंडप उभारण्यात आला

सागर सूर्यवंशी, नांदेड

Nanded Taluka School Closed 24th January विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हिंद दी चादर कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा आदेश दिला आहे. या कार्यक्रमाला देश विदेशातून हजारो भाविक नांदेडमध्ये येणार असल्याकारणाने भाविकांची सोय, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान,यांच्यासह मंत्री या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहेत.

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ आणि २५ जानेवारी रोजी हा कार्यक्रम नांदेड शहरातील मोदी मैदानावर पार पडणार आहे.

या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ५० एकरवर भव्य मंडप यासाठी उभारण्यात आला आहे. येणाऱ्या भाविकांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली असून महाराष्ट्र शासनातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू असताना घातपाताचा कट उधळला; 'जैश'च्या दहशतवाद्याला कंठस्नान

Saturday Horoscope: गुंतवणुकीचा होईल फायदा, 4 राशींना होणार आर्थिक लाभ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

आज बाळासाहेब नाहीयेत ते बरं आहे; राज ठाकरे असे का म्हणाले? VIDEO

मुंबईत महिला ग्राहकावर हल्ला, अर्बन कंपनी थेरपिस्टचा व्हिडिओ व्हायरल, धक्कादायक कारण समोर

Maharashtra Live News Update: बाळासाहेबांबद्दल आम्ही तासंतास बोलू शकतो- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT