Uddhav Thackeray Saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : गद्दाराला गाडा अन नांदेड उत्तरमध्ये मशाल पेटवा; उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

Nanded News : नांदेड उत्तरच्या विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड उत्तरमध्ये गद्दाराला गाडून मशाल पेटवा; असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. ज्यांनी ज्यांनी गदारी केली, ती गद्दारी राजकारणातून नष्ट करावी लागेल. असेही ठाकरे यांनी सांगितले आहे.  

नांदेड (Nanded) उत्तरच्या विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून अब्दुल सत्तार तर ठाकरे गटाकडून संगीता पाटील डक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नांदेड उत्तरमधून काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे सांगितले. तर आज (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी संगीता पाटील डक यांना निवडून आणण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. 

नांदेड उत्तरमध्ये गद्दाराला गाडून मशाल पेटवा; असे आदेश ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. ज्यांनी ज्यांनी गदारी केली, ती गद्दारी राजकारणातून नष्ट करावी लागेल. उमेदवारी वरून अनेक जण नाराज झाले होते. पण व्यक्तीगत विरोध पाहता आपला भगवा झेंडा कसा विजयी झाला पाहिजे; याचा विचार करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे. दरम्यान वंचितचे नेते डॉ. बिडी चव्हाण यांच्यासह अनेकांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Maharashtra Live News Update: धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भांडगाव येथील विश्वरुपा नदिवरील पुल ढासळला

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

SCROLL FOR NEXT