Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: लग्नात डिजे वाजवण्यावरून दोन गट भिडले

लग्नात डिजे वाजवल्यावरून दोन गट भिडले

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेडच्या किनवट शहरात रविवारी रात्री दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. लग्नात (Marriage) डीजे लावण्यात आला होता. या डिजेच्या गाण्यावर नाचत असताना दुसऱ्या गटाकडून डिजे बंद करा असे धमकवण्यात (Nanded) आल्याने वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. (Maharashtra News)

सध्‍या लग्‍नसराई सुरू आहे. यात नांदेडमध्‍ये असलेल्‍या लग्‍नसोहळ्यात रविवारी डीजे सुरू होता. परंतु, हा डीजे बंद करा; असे काहींनी सांगितले. यावरून दोन गटात वाद झाला. यातील काहीनी दगडफेक देखील केली. या दगडफेकीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर किनवट शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सह वरिष्ठ पोलीस अधिकारी किनवट येथे दाखल झाले.

११ जण पोलिसांच्‍या ताब्‍यात

दोन्ही गटातील ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही गटाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरील घटना किरकोळ असून सध्या किनवट शहरात शांतता आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT