Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : एकाच कुटुंबातील तिघांना विषबाधा; किनवट तालुक्यातील पांगरी गावातील घटना, आरोग्य पथक गावात दाखल

Nanded News : एकाच कुटुंबातील तिघांना विषबाधा झाल्याची माहिती समजताच नांदेड येथून आरोग्य पथक लागलीच गावात दाखल झाले. डॉक्टरांनी विषबाधा झालेल्या कुटुंबातील नातेवाईकांची प्रत्यक्षपणे भेट घेवून विचारपूस केली

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड : किनवट तालुक्यातील पांगरी या गावातील एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान विषबाधा कोणत्या कारणामुळे झाली याचे कारण अद्याप समोर आले नसून आरोग्य पथक गावात दाखल झाले आहे. कुटुंबाची तपासणी केली जात असून गावातील पाण्याचे नमुने देखील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील किनवट पांगरी या गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात गावात राहणारे अनिकेत गणपत वनेकर (वय १५), ऋषिकेश गणपत वनेकर (वय ११) व आई सुचिता गणपत वनेकर असे विषबाधा झालेल्याची नावे असून हे तिघेही एकाच कुटुंबातले आहेत. या तिघांनाही नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोग्य पथक गावात दाखल 

दरम्यान एकाच कुटुंबातील तिघांना विषबाधा झाल्याची माहिती समजताच नांदेड येथून आरोग्य पथक लागलीच गावात दाखल झाले आहे. पथकातील डॉक्टरांनी विषबाधा झालेल्या कुटुंबातील नातेवाईकांची प्रत्यक्षपणे भेट घेवून त्यांची विचारपूस केली. मात्र विषबाधा कशातून झाली आहे? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र पीडित कुटुंबाने वांग्याची भाजी, खिचडी आणि कलाकंद खाल्ल्याचे समोर आले आहे. त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. 

पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत 

पांगरी गावात तिघांना झालेली विषबाधा हि पाण्यातून तर झाली नाही; याची तपासणी करण्यासाठी गावात दाखल झालेल्या डॉक्टरांनी येथील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवीले आहेत. विषबाधा झाल्याचे समोर आल्याने आरोग्य विभाग खडबडून  जागे झाले असून इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रत्नमाला जानगेवाड यांच्यासह आरोग्य सेविका, आशा वर्कर यांनी गावातील प्रत्येक घराला भेट देऊन स्वच्छतेबाबत सांगून विचारपूस करत काळजी घेण्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये एकनाथ शिंदेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू

उद्योगांच्या स्थलांतराच्या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदेंची रॅपिड अ‍ॅक्शन! आधुनिक पद्धतीने चाकणचे खड्डे बुजवायला सुरूवात

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

SCROLL FOR NEXT