ATM Crime  Saam tv
महाराष्ट्र

ATM Crime : चोरट्यांनी एटीएम मशीनच लांबविली; चोरट्यांनी अगोदर फोडला सीसीटीव्ही

Nanded News : मशीन चोरीची घटना आज सकाळी उघडकीस आली. पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस दाखल झाले असून पोलिसांना घटनास्थळी मोठी दोरी आणि एक पोत आढळून आले आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : चोरट्यांकडून एटीएम मशीन आता टार्गेट केले जात आहे. गॅस कटरच्या सहाय्याने मशीन कापून त्यातील रोकड लांबविल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात आता थेट एटीएम मशीनचा घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवली आहे. मध्यरात्री ही चोरी झाली. बारड- भोकर मार्गावर मुख्य रस्त्यावरच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम आहे. दरम्यान रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ही एटीएम (ATM) मशिन चोरून नेली. एटीएम मशीनची चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेरा फोडला. त्यामूळे नेमकी चोरी झाली कशी आणि चोरटे कोण याचा तपास लावने अवघड झाले. 

रक्कमेबाबत अद्याप माहिती नाही 

सदर मशीन (Theft) चोरीची घटना आज सकाळी उघडकीस आली. पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस दाखल झाले असून पोलिसांना (Police) घटनास्थळी मोठी दोरी आणि एक पोत आढळून आले आहे. याचा तपस सुरु असून एटीएम मशिनमध्ये रककम किती होती, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar death News LIVE Updates : महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असणारा नेता हरपला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ajit Pawar death news: वडील नाहीत याची जाणीव दादांनी कधीच होऊ दिली नाही, धनंजय मुंडेंना रडू आवरेना

Ajit Pawar Death: उद्धवस्त... अजितदादा गेल्यानंतर सुप्रियाताईंची पहिली पोस्ट

Chat Masala : घरच्या घरी बनवा चटपटीत चाट मसाला, वाचा रेसिपी

Ajit Pawar Political Journey: 1991 ते 2026, दादांनी कोणकोणती पदे सांभाळली? जाणून घ्या अजित पवारांचा राजकीय प्रवास!

SCROLL FOR NEXT