Crop Loan : वर्धा जिल्ह्यात पीक कर्जासाठी बँकांना ११०० कोटींचे उद्दिष्ट; १० टक्के कर्ज वितरित

Wardha News : खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात असते. करीत हंगामाला आता सुरवात होत असून त्यादृष्टीने बँकांकडून कर्ज वाटपाला सुरवात झाली आहे. बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देखील देण्यात आले
Crop Loan
Crop LoanSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील विविध बँकांना खरीप व रब्बी हंगामात मिळून एकूण एक हजार १०० कोटी रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार कर्ज वितरणास सुरवात झाली असून आतापर्यंत १० टक्के कर्ज वितरित करण्यात आले आहे. 

Crop Loan
Sambhajinagar News : मूळव्याधीचा डॉक्टर करायचा गर्भपात; विनापरवाना सुरू होते तीन वर्षांपासून सिल्लोडचे हॉस्पिटल

खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज (Crop Loan) उपलब्ध करून दिले जात असते. करीत हंगामाला आता सुरवात होत असून त्यादृष्टीने बँकांकडून कर्ज वाटपाला सुरवात झाली आहे. बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देखील देण्यात आले आहे. (Wardha) वर्धा जिल्ह्यासाठी एकूण १ हजार १०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यात खरिपासाठी ८२४ कोटी ३८ लाख ५८ हजार रुपये व रब्बीसाठी २७५ कोटी ६१ लाख ४२ हजार रुपये पीककर्ज उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी ३० एप्रिलपर्यंत केवळ ५ हजार ६६१ शेतकऱ्यांच्या खात्यात ७६ कोटी ६८ लाख ९७ हजारांची रक्कम जमा केली आहे.

Crop Loan
Gondia Accident : महामार्गावर भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; एकाच जागीच मृत्यू, १५ वर्षीय युवक गंभीर

गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण पीककर्जाच्या उद्दिष्टात २०० कोटींनी उद्दिष्ट कमी करण्यात आले आहे. गतवर्षी जिल्हा अग्रणी बँकेला १३०० कोटी कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. खरीप हंगामात कागदपत्रांच्या जाचक अटींमुळे अनेक (Farmer) शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नाही. खरीप हंगामाच्या (Kharif Season) अखेरपर्यंत ८२ हजार ५ खातेधारकांना १ हजार ३३ कोटी ७९ लाख ७४ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. उद्दिष्टाच्या ७९.५२ टक्केच कर्ज वाटपाची टक्केवारी राहिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com