Nanded Police Saam tv
महाराष्ट्र

Nanded Police : पोलीस निरीक्षकाकडून होमगार्डला मारहाण; फोटो झाले व्हायरल

Nanded News : चौकात वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत असताना पोलीस निरीक्षकाकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे होमगार्डला मारहाण प्रकरणाची चौकशी आता अपर पोलीस अधीक्षक करणार.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 

नांदेड : नांदेड शहरात कर्तव्यावर असणाऱ्या एका होमगार्डला वजीराबाद पोलीस निरीक्षकाकडून मारहाण करण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे. कर्तव्य बजावत असताना कामात कसूर केल्यावरून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान मारहाण झाल्याने पाठीवर तीन वळ उमटले असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या प्रकरणी चौकशी सुरु आहे. 

नांदेड शहरातील तिरंगा चौकात वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी गृहरक्षक दलाचे जवान कैलाश गंगाराम हिंगोले यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यानुसार कैलास हिंगोले हे कर्तव्य बजावत असताना आपला कर्तव्यात कुचराई करत असल्याप्रकरणी वजीराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंगोले यांनी तक्रार देखील केली आहे. 

चौकशीचे आदेश 

होमगार्डच्या पाठीवर तीन वळ आल्याचे फोटो समजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. दरम्यान या प्रकरणानंतर हिंगोले यांच्याकडून तक्रार करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी आता अप्पर पोलीस अधीक्षक तथा गृहरक्षक दलाचे जिल्हाप्रमुख सुरज गुरव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.

कृषी पंप चोरणारे ५ जण पोलिसांच्या ताब्यात
नाशिक : नाशिकच्या सटाणा (बागलाण) तालूक्यात शेतकऱ्यांचे कृषी पंप चोरून नेणाऱ्या पाच जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. तालूक्यातील लखमापूर, धांद्री, अजमेर सौंदाणे, ब्राम्हणगाव या परिसरातून शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रीक पंप, जलपरी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. सटाणा पोलिसात चोरीच्या तक्रारी वाढल्याने पोलिसांनी पथक तयार करुन पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेत ११ इलेक्ट्रीक पंप व जलपरी असा १ लाख १३ हजार रुपयांच्या हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT