Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: पैनगंगा नदीतील धोकादायक प्रवास संपणार; ४० वर्षांपासून होती प्रतिक्षा

पैनगंगा नदीतील धोकादायक प्रवास संपणार; ४० वर्षांपासून होती प्रतिक्षा

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीतून धोकादायक प्रवास सुरू होता. परंतु, हा धोकादायक प्रवास आता (Nanded News) संपणार आहे. पुल बांधकामास ५५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याने गावकऱ्यांनी राज्य शासनाचे तसेच लोकप्रिनिधींचे आभार मानले. (Breaking Marathi News)

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वाटेगाव ते कारखेड ह्या दोन गावानं सोबतच मराठवाडा ते विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील पुलाच्या बांधकामास राज्य सरकारने ५५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी पुल बाधण्याची मागणी दोन्हीकडील गावकऱ्यांनी होती. या नदीतून तराफ्याच्या साहाय्याने या दोन्ही गावातील गावकरी जीवघेणा प्रवास करीत होते.

४० वर्षापासून होती मागणी

जवळपास ४० वर्षापासून मागणी करत असलेल्या या गावकऱ्यांना अखेर न्याय मिळाला. या पैनगंगा नदीवर आता ५५ कोटी रुपये खर्च करून पुल बांधण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या घोषणेनंतर राज्य शासन तसेच लोक्रतिनिधींचे गावकऱ्यांनी आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या गळाला, चर्चांना उधाण

मध्यभागी मनोज जरांगेंचा ताफा; रस्त्याच्या दोन्ही बाजुला नागरिकांची तुफान गर्दी; चौकात पाय ठेवलायलाही जागा नाही, पाहा फोटोज

2 हजारांवरील UPI पेमेंटसाठी शुल्क लागणार? अमेरिकेच्या दबावामुळे UPIवर शुल्काची तयारी

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT