Nanded Lok Sabha Saam tv
महाराष्ट्र

Nanded Lok Sabha : नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला; भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

Nanded News : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यासोबतच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम देखील जाहीर झाला होता

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून नांदेड लोकसभेसाठी पोटनिवडणूक देखील लागली आहे. यात नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांना लोकसभा पोट निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यासोबतच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम देखील जाहीर झाला होता. यामुळे (Nanded) नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार शोधण्यासोबत लोकसभेसाठी उमेवार निवडीचा पेच होता. दरम्यान काँग्रेस पक्षाकडून दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर (BJP) भाजपने देखील उमेदवाराची घोषणा करत डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी घोषित केली आहे. 

आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण आणि भाजपकडून डॉ संतुक हंबर्डे मैदानात असणार आहेत. भाजपकडून डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर होताच नांदेडमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. वरिष्ठ नेत्यांचे हंबर्डे यांनी आभार मानले. नांदेडच्या जनतेच्या विकासासाठी आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो, असल्याची प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT