Nanded News
Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: इथं भरतो गाढवांचा सर्वात मोठा बाजार; जपली जातेय अनोखी परंपराही

संतोष जोशी

नांदेड : हवश्या गवश्या नवश्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रा गाढवांचा बाजारासाठी प्रसिद्ध आहे. देशातील सर्वात मोठा (Nanded) गाढवांचा बाजार या यात्रेत भरतो. हजारो गाढवांच्या खरेदी विक्रीतून मोठी उलाढाल या ठिकाणी होत असते. या बाजाराचे अनेक वैशिष्ट्ये ही आहेत. (Maharashtra News)

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली श्री क्षेत्र माळेगावच्या खंडोबा देवाच्‍या यात्रेत उंदरापासून ते उंटापर्यंतचे सर्वच प्राणी पक्ष्यांचा बाजार भरतो. कोरोनामुळे (corona News) तीन वर्ष यात्रा भरली नाही. यंदा यात्रा चांगली भरली आहे. गाढवांचा बाजारही चांगला भरलाय. अनेक राज्यातून गाढव या बाजारात विक्रीसाठी आणले जातात. यंदा गाढवांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसते. 15 हजार ते 60 हजारापर्यंत गाढव विक्रीसाठी आली आहेत.

गाढवांच्या खरेदी- विक्रीची अनोखी परंपरा आजही काही प्रमाणात पाळली जाते. यंदा सौदा करुन थोडीबहुत किंमत देऊन गाढव घेऊन जायचे पुढच्यावर्षी सौदा केलेली संपुर्ण रक्कम देतात. एकंदरच यंदा यात्रेत गाढवांच्या उलाढालीतून मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याने गाढवं पाळणाऱ्यांत सभाधान व्यक्त केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Copper Ring: तांब्याची अंगठी धारण का करावी ? त्यांचे फायदे कोण कोणते ?

Today's Marathi News Live: शरद पवारांचा विश्वासू शिलेदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार?

Shruti And Santanu Break Up : ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हासन आणि शांतनू हजारिकाचा ब्रेकअप?, एकमेकांना इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

Chilled Water: फ्रीजशिवाय थंड पाणी कसं प्यायचं?

Narendra Modi Sabha: भाजपकडून प्रचारसभांचा धडाका, PM मोदी दिवसभरात घेणार ४ सभा, कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी

SCROLL FOR NEXT