Sushma Andhare: सुषमा अंधारेंची पुन्हा वारकरी संप्रदायावर टिका; पेड किर्तनकार असा केला आरोप

सुषमा अंधारेंची पुन्हा वारकरी संप्रदायावर टिका; पेड किर्तनकार असा केला आरोप
Sushma Andhare
Sushma AndhareSaam tv
Published On

पंढरपूर : शिवसेना (Shiv Sena) नेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायावर पुन्हा टिका केली आहे. किर्तनकार हे वारकरी संप्रदायाचे नसून ते मोहन भागवत (Mohan Bhagawat) संप्रदायाचे आहेत असे धक्कादायक विधान केले आहे. यामुळे सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) वादाचा तोंड फोडले आहे. (Tajya Batmya)

Sushma Andhare
Gold Price Today: सोन्याच्या दरवाढीचा उच्चांक कायम; चांदीलाही चकाकी

सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी असेच (Pandharpur) वारकरी संप्रदाय विषयी वादग्रस्त विधान करताना संतांनी रेड्यांना शिकविले. मात्र माणसांना शिकविले नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर बरीच टिका झाली होती. विविध वारकरी संघटनांनी आंद़ोलन ही केले होते. अशातच आज सुषमा अंधारे यांनी पुन्हा वारकरी संप्रदायाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने आणखी खळबळ उडाली आहे.

ते किर्तनकार पेड

वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद अद्याप संपलेला नाही. अशात सुषमा अंधारे यांनी पुन्‍हा वाद निर्माण केला आहे. त्‍यांनी माझ्या विरोधात आंदोलन करणारे किर्तनकार हे पेड किर्तनकार असून ते मोहन भागवत संप्रदायाचे आहेत; असे वक्तव्य केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com