Nanded Rain Saam tv
महाराष्ट्र

Nanded Rain : गोदावरी, असना नदीच्या पुराचे पाणी शेतात; शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचा झाला चिखल

Nanded News : सोयाबीन पिकात गुढगाभर पाणी साचले असल्याने पूर्ण पीक पाण्यात सडून गेले आहे. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असल्याने एकरी 50 हजार नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 

नांदेड : मराठवाड्यात यंदा पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चिखल केला. या पावसामुळे राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. महिना उलटला परंतु नांदेड जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरु आहे. यात नदी- नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने गुडघाभर पाण्यात पीक गेल्याने सोयाबीन पिकाचा अक्षरशः चिखल झाला आहे. 

मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात मोठा पाऊस झाला. या पावसामुळे गोदावरीसह उपनद्यांना मोठा पूर आला आहे. या पुरामुळे नदी काठच्या शेत जमिनी खरडून गेल्या आहेत. सोयाबीन, कापूस यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आजही पिके पाण्याखाली आहेत. सोयाबीन पिकाचा अक्षरशः चिखल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. या नुकसानीने शेतकरी संकटात सापडला असून मदतीची आस या शेतकऱ्याला लागून आहे. 

५० हजारांची तात्काळ मदत द्यावी 

मुसळधार पावसात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून एकरी ५० हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत शासनाने द्यावी; अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.

शेतातच सडतोय टोमॅटो 

जुन्नर : गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या सततच्या पावसामुळे टोमॅटो बागांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. आधीच बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असताना आता शेतातील पीक पूर्णपणे चिखलात गेल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. पावसामुळे टोमॅटोच्या बागांमध्ये पाणी साचून झाडे कुजण्यास सुरुवात झाली आहे. झाडांना लागलेले लाल टोमॅटो शेतात पडून चिखलात मिसळत आहेत. परिणामी शेतकरी हातातोंडाशी आलेले पीक वाचवू शकत नसल्याने अक्षरशः टोमॅटोच्या बागा सोडून देण्याची वेळ आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

SCROLL FOR NEXT