Lok Sabha Election Saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election : इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्याना करता आले नाही मतदान; ईडीसी प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याचा आरोप

Nanded News : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया २६ एप्रिलला पार पडली. यात नांदेड लोकसभेसाठी देखील मतदान झालं

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असून या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली (Nanded) आहे. या कर्मचाऱ्यांना देखील आपला मतदानाचा हक्क बजावत यावा; यासाठी पोस्टल मतदान करता येत असते, यासाठी आवश्यक असलेले इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट जिल्हा प्रशासनाकडून लवकर न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांना (Voting) मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया २६ एप्रिलला पार पडली. यात नांदेड लोकसभेसाठी देखील मतदान झालं. मात्र मतदान केंद्रावर काम करणाऱ्या असंख्य शिक्षकांना मतदानापासून वंचित राहावं लागल्याचा आरोप करण्यात आला. लोकसभेच्या मतदान प्रक्रियेसाठी (Zilha Parishad) जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह इतर शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशिक्षणा पासून ते मतदाना पर्यंत हे कर्मचारी कर्तव्यावर होते. पोस्टल मतदानासाठी या कर्मचाऱ्यांनी फॉर्म देखील भरले होते. असे असताना मतदानाचा हक्क बजावत आला नाही. 

प्रमाणपत्र देण्यास विलंब 

जिल्हा प्रशासनाकडून मतदान ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईडीसी म्हणजे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट देण्यात नाही, त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मतदान प्रक्रिया पासून दूर रहावे लागले; असा आरोप शिक्षकांनी केला आहे. दरम्यान मतदानापासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी; अशी मागणी शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT