Himayatnagar : हिमायतनगरमध्ये भीषण पाणीटंचाई, 19 कोटी रुपयांच्या योजनेचा नुसताच गाजावाजा; महिला उपाेषणाच्या तयारीत

Nanded Latest Marathi News : हिमायतनगर शहरातील महिलांना भर उन्हात हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करावे लागत आहे असे विदारक चित्र शहरात पहायला मिळत आहे.
water scarcity in himayatnagar nanded
water scarcity in himayatnagar nandedSaam Digital

- संजय सूर्यवंशी

Nanded :

नांदेडच्या हिमायतनगर शहरात पाणीटंचाई निर्माण झालीय. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. शहरात पाणी पुरवठा करावा अन्यथा नगर पंचायती समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. (Maharashtra News)

हिमायतनगर शहरात उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. शहरात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. एकीकडे नगरपंचायतच्या 19 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा नुसता गाजा वाजा करून लोकप्रतिनिधी मोकळे झाले आहेत तरी पण पाणी काही मिळत नाही.

water scarcity in himayatnagar nanded
Dhule Constituency : धुळ्यातील काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर अखेर पडला पडदा, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेरांमुळे शाेभा बच्छाव यांची वाढली ताकद

शहरातील महिलांना भर उन्हात हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करावे लागत आहे असे विदारक चित्र शहरात पहायला मिळत आहे. हिमायतनगरच्या भीषण पाणी टंचाईवर येथील नगरपंचायत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचा संताप महिलांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

water scarcity in himayatnagar nanded
Nandurbar: नवापूर सीमा तपासणी नाक्यावर एसीबीचा छापा, दाेन शासकीय अधिका-यांसह एकास घेतलं ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com